उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या भाच्याच्या प्रेमात (love)वेड्या झालेल्या मामीने पोलीस चौकीच्या आतमध्येच हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलीस चौकीत एकच गोंधळ उडाला.मामी आणि भाच्यामधील वाद मिटवण्यासाठी दोघांना पोलीस चौकीत बोलावले होते. यावेळी भाच्याने मामीसोबतचे संबंध पूर्णपणे तोडण्यास नकार दिल्याने मामीने हे टोकाचे पाऊल उचलले. पीडित मामीवर सध्या लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हे संपूर्ण प्रकरण पिसावा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.

पिसावा पोलीस स्टेशन हद्दीतील कुतूबनगर येथे राहणाऱ्या पूजा मिश्रा यांचा विवाह ललित मिश्रा यांच्याशी झाला होता. ललित गाझियाबादमध्ये मजुरीचे काम करत होता. कामात मदत व्हावी म्हणून त्याने आपला भाचा आलोक याला गाझियाबादला बोलावले. ललित आणि पूजाला दोन मुले आहेत. याचदरम्यान आलोक आणि त्याची मामी पूजा यांच्यात प्रेमसंबंध जुळले. ललितला जेव्हा पत्नी आणि भाचा यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली, तेव्हा त्याने आलोकला हाकलून दिले. यानंतर पूजाही आपल्या मुलांना सोडून आलोकसोबत बरेलीला गेली. तिथे हे दोघे सुमारे सात महिने एकत्र राहिले.

बरेलीत आलोक ऑटो चालवत होता. काही महिने त्यांचे संबंध चांगले राहिले, पण त्यानंतर छोट्या-छोट्या कारणांवरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. वाद वाढल्यामुळे आलोकने पूजाला सोडले आणि तो आपल्या मूळ गावी सीतापूरमधील पिसावा येथील मढिया येथे परतला. आलोक त्याला सोडून जात असल्याचे कळताच पूजाही सीतापूरला पोहोचली आणि तिने आलोकविरुद्धच्या वादाचे प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस चौकीत तक्रार अर्ज दिला.

या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी पोलिसांनी आलोक आणि पूजा दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावले होते. दोघांमध्ये समेट घडवून आणण्याची चर्चा सुरू असतानाच, आलोकने पूजाला आपल्यासोबत ठेवण्यास स्पष्टपणे नकार दिला. या गोष्टीचा पूजाला राग आला आणि तिने पोलीस चौकीच्या आतमध्येच हाताची नस कापून घेतली. या घटनेमुळे पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांमध्ये तत्काळ खळबळ(love) उडाली. पोलिसांनी तातडीने पीडित पूजाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, ललित (पूजाचा पती) हा पूजापेक्षा सुमारे १५ वर्षांनी लहान आहे.

हेही वाचा :

बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्…

तोंडात रॉकेल घेतलं, आगीवर फूंकर मारली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *