सध्या लोकांना सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे, हिरोगिरीचे प्रचंड वेड लागले आहे. यासाठी लोक धोकादायक स्टंटबाजी करत आहेत. आपला आणि आपल्यासोबत इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. यामुळे अनेक लोकांना आयुष्यभरासाठी गंभीर दुखापत झाली आहे. मात्र कोणीही सुधारण्याचे नाव घेत नाही. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीला आगीशी(fire) खेळणं महागांत पडलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक स्टंटबाजीचा शो सुरु आहे. या ठिकाणी एक तरुणी धोकादायक स्टंट करत आहे. तिने तोडांत पेट्रोल घेऊन आगीवर फूंकर मारली आहे. पण यानंतर तिच्या अति आत्मविश्वासामुले जे घडलं ते भयंकर आहे. आगीवर फुंकर मारताच भडका उडाला असून तरुणीच्या तोडांला आग लागली आहे. यामुळे तरुणीचा चेहरा चांगला भाजला आहे. तरुणी आग(fire) विझवण्याचा प्रयत्न करते. पण आग विझता विझत नाही. तिच्या सोबत शो करणारे लोक तिला वाचवण्यासाठी येतात. तुम्ही पाहू शकता की, तरुणीचा चेहरा पूर्ण लाल झालेला आहे. तिचे केस देखील या दुर्घटनेत जळाले आहे. अनेकदा स्टंट करणाऱ्या लोकांसोबत देखील दुर्घटना घडण्याची शक्यता असते. यामुळे कधीही अति आत्मविश्वास असू नये.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @bipinyadav8933 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत दिदीचा आत्मविश्वास चांगलाच होता असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने आता दिदी स्टंट लाईफमधून ब्रेक घेईल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने चांगली अद्दल घडली, आता पुन्हा असा स्टंट सात जन्मात करणार नाही असे म्हटले आहे. तिसऱ्याने म्हटले आहे की, तिच्या अतिआत्मविश्वास तिला नडला.. अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची योग्य माहिती मिळाली आहे. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

तर एकाला कापायला काय हरकत… पुन्हा एकदा बच्चू कडूंचे आमदारांबद्दल ते विधान

वाळवंटाचे जहाज रस्त्यावर उतरले, स्केटिंग शूज घालत मोठ्या तोऱ्यात उंटाने करून दाखवली स्केटिंग… मजेदार Video Viral

बायकोचा गळा दाबून खून, नवऱ्यानं मृतदेह बाथरूममध्ये लपवला; लेकीनं आईला पाहिल्यानंतर…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *