उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील हुसैनपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पवित्र मानल्या जाणाऱ्या दीर-वहिनीच्या नात्याने मर्यादांची सीमा ओलांडली, आणि त्याचा शेवट मृत्यूच्या रूपात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ललित (19) आणि त्याची वहिनी आरती (35) यांच्या दरम्यान काही महिन्यांपासून प्रेमसंबंध(relationship) सुरु होते. मात्र या नात्याला कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. कुटुंबातील दबाव आणि सामाजिक बंधनामुळे दोघांनी दिवाळीच्या दिवशी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी दोघे गावाजवळील जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळले. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.आरतीला दोन लहान मुलं आहेत — एक नऊ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा. आईच्या निधनाने दोघंही व्याकुळ झाले आहेत.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी आरती आणि ललित घरातून फरार झाले होते. नंतर पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आणि आरतीला कुटुंबीयांच्या समजावण्यावरून घरी परत आणलं होतं(relationship). परंतु काही दिवसांनीच दोघांनी पुन्हा टोकाचं पाऊल उचललं.किरतपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक पुष्पा देवी यांनी सांगितलं की, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच दोघांनी कोणता विषारी पदार्थ घेतला होता याचा खुलासा होईल.या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ललित आणि आरतीच्या कुटुंबात शोकाकुल वातावरण असून, दोन्ही घरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा :
२० रुपयांच्या ‘या’ पदार्थामुळे होतील काळेभोर सुंदर केस
गृहिणींसाठी पोस्ट ऑफिसची योजना; एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा हमखास मिळेल उत्पन्न
सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण…