राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, पक्षांतराच्या घडामोडींनी राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकांच्या तोंडावर निष्ठा बदलण्याचे प्रकार वाढत असून, याचा फटका प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसताना दिसत आहे.स्थानिक निवडणुका (elections)जवळ येत असताना, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुंबईतील पक्षाचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सगुण नाईक यांच्यासोबतच मुंबई आणि अहिल्यानगर येथील अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी शिंदे गटात प्रवेश केला. महापालिका निवडणुका तोंडावर असताना प्रमुख शहरातील माजी नगरसेवकाने पक्ष सोडणे, हे ठाकरे गटासाठी निश्चितच चिंतेची बाब ठरली आहे. पक्षांतराचे हे सत्र ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरत आहे.दरम्यान, राज्यात स्थानिक निवडणुका कशा लढवल्या जाणार, याबाबत अद्यापही अस्पष्टता(elections) आहे. महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की घटक पक्ष स्वबळावर नशीब आजमावणार, याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र लढणार असल्याचे सांगत असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र स्वबळाच्या घोषणा दिल्या जात आहेत.
महाविकास आघाडीमध्येही जागावाटप आणि युतीबाबत संभ्रमावस्था कायम आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने मात्र निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने विभागवार बैठका घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे राजकीय उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा :
तर एकाला कापायला काय हरकत… पुन्हा एकदा बच्चू कडूंचे आमदारांबद्दल ते विधान
वाळवंटाचे जहाज रस्त्यावर उतरले, स्केटिंग शूज घालत मोठ्या तोऱ्यात उंटाने करून दाखवली स्केटिंग… मजेदार Video Viral
बायकोचा गळा दाबून खून, नवऱ्यानं मृतदेह बाथरूममध्ये लपवला; लेकीनं आईला पाहिल्यानंतर…