नागपूरमधून एक चोरीची घटना समोर आली आहे. आजारी आईच्या उपचारासाठी (treatment)न्यायालयाच्या फौजदारी विभागातील महिला लिपिकाच्या कार्यालयात ठेवलेल्या बॅगमधून ३५ हजार रुपये चोरी केली. पोलिसांनी कळमेश्वर येथील एका अस्थायी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. प्रणय थोरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी वाडीभस्मे या फौजदारी विभागात लिपिक आहेत.

संध्याकाळीच्या दरम्यान वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश यांच्या चेंबरमध्ये त्या गेल्या होत्या. त्यांची पर्स विभागातच होती. परत आल्यावर त्यांना पर्सची चेन उघडी आढळली. त्यात ठेवलेले ३५ हजार रुपये गायब होते. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी प्रणय थोरात पैसे चोरताना दिसला याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोहिणी वाडीभस्मे या फौजदारी विभागात लिपिक आहेत. संध्याकाळीच्या दरम्यान वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश यांच्या चेंबरमध्ये त्या गेल्या होत्या. त्यांची पर्स विभागातच होती. परत आल्यावर त्यांना पर्सची चेन उघडी आढळली. त्यात ठेवलेले 35 हजार रुपये गायब होते. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी प्रणय थोरात पैसे चोरताना दिसला.

प्रणय हा एक अस्थायी कर्मचारी असून तो ड्युटी नसतांनाही कार्यालयात आला होता. रोहिणी वाडीभस्मे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी प्रणय थोरात याला अटक करण्यात आली आहे. आजारी आईच्या उपचारासाठी पैसे चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
साहिल महेबूब शहापुरे हा २२ वर्षाचा युवक आहे. तो सोलापूरच्या अशोकनगरमध्ये राहतो. तो सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण ही घेत आहे. त्याच्या वडिलांचे भंगाराचे दुकान आहे. ते चांगले चालावे म्हणून साहिलने आपल्याच परिसरातील दुचाकी चोरायला सुरुवात केली. त्याने जवळपास ११ दुचाकी चोरल्या. त्यानंतर या दुचाकीचे पार्ट तो वेगळे करायचा आणि आपल्या वडिलांच्या भंगाराच्या दुकानात ठेवायचा. यातले अनेक पार्ट त्याने रहीम इरफान शेख या भंगारवाल्याला विकले होते. शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीचा तपास सोलापूर पोलीस करत होते. त्याच वेळी त्यांना साहिल याची माहिती मिळाली.
साहिल हा संशयतीरीत्या हरीभाई प्रशालेच्या मागील बाजूस फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याला एक दुचाकी चोरताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर, सदर बाझारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वडीलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आपण हे कृत्य करत असल्याचं त्याने कबूल केलं आहे.
दुचाकी चोरल्यानंतर तो दुचाकीचे पार्ट वेगळे करण्यासाठी एका व्यक्तीला भेटत होते(treatment). त्यासाठी त्याला पाचशे रुपये देण्याचे ठरवले होते. परंतु त्यालाही या आरोपीने चारशे रुपयेच दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी पार्ट खरेदी करणारे आणि पार्ट वेगळे करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
तारक मेहता..’मधील दयाबेनच्या लग्नातील फोटो पहिल्यांदाच समोर
‘माधुरी’वर सर्वोच्च न्यायालयात कोणता निर्णय होणार?
साधूंच्या वेशात आले, ‘रक्षा’ बांधून महिलेला भुरळ घातली अन्