‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून अभिनेत्री दिशा वकानी घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर पहिल्यांदाच तिच्या लग्नाचे (wedding)फोटो समोर आले आहेत. या लग्नात मालिकेतील काही कलाकारसुद्धा उपस्थित होते.दिशा वकानीने 26 नोव्हेंबर 2015 रोजी लग्न केलं. मुंबईतल्या जुहू इथल्या सन अँड सँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचं रिसेप्शन पार पडलं. या लग्नाचं आमंत्रण अनेक सेलिब्रिटींना होतं.दिशाने वयाच्या 37 व्या वर्षी लग्न केलं होतं. पारंपरिक गुजराती विवाहपद्धतीने तिने लग्न केलं होतं.

या खास दिवशी तिने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.दिशाने चार्टर्ड अकाऊंटंट मयुर पाडियाशी लग्न केलंय. या दोघांना दोन मुली आहेत. रिसेप्शनमध्ये दिशाने सिल्क गाऊन परिधान केला होता(wedding). त्यावर हिऱ्यांचा हार घातला होता. या लूकमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत होती.या लग्नाला दिशाचा ऑनस्क्रीन पती जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशीसुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासोबत रील-लाइफ मुलगा टप्पू म्हणजेच अभिनेता भव्य गांधी आणि बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्तासुद्धा उपस्थित होते.
हेही वाचा :
साधूंच्या वेशात आले, ‘रक्षा’ बांधून महिलेला भुरळ घातली अन्
६० कोटींचा घोटाळा! शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडकले….
सचिनपेक्षा अर्जुन इतका उंच कसा? ही आहेत कारणं…