एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पतीने पत्नीला सोबत झोपण्यास (sleep)बोलावले होते. दोघे एकत्र तर झोपले पण काही कारणावरुन भांडण झाले. त्यानंतर पतीने जे कृत्य केलं ते ऐकून पोलिसही हादरले.नवरा आणि बायकोमधील भांडणे हे काही नवीन नसतात. त्यांच्यामध्ये भांडणे होतात आणि नंतर ते पुन्हा एकत्र देखील येताना दिसतात. पण सध्या नवरा-बायकोमधील भांडण अगदी टोकाला गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नवरा-बायकोमधील झोपण्याच्या मुद्द्यावरून भांडण इतके वाढले की नवऱ्याने बायकोवर थेट हात उचलला.

त्याने ठोसा मारून तिचा जीवच घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया..म्हणतात की पती-पत्नीमध्ये भांडणे-तंटे तर होतच असतात, पण यादगीर जिल्ह्यात घडलेला प्रकार ऐकून प्रत्येकजण थक्क झाले. येथे एकत्र झोपण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमधील भांडण इतके वाढले की पत्नीचा जीव गेला. ही घटना हुनासगी तालुक्यातील बुडागुम्पर डोड्डी गावात घडली, ज्याने संपूर्ण परिसर हादरला.21 वर्षीय अय्यम्मा आणि तिचा पती अमरेश गुडागुंती यांचे लग्न फक्त दोन वर्षांपूर्वी झाले होते.

लग्नानंतर त्यांच्यामध्ये मुलांबाबत चिंता होती, कारण त्यांना अजूनही मूल झाले नव्हते. याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद आणि भांडणे होत होती. पोलिसांच्या मते, 11 ऑगस्तच्या रात्री अमरेशने आपल्या पत्नीला एकत्र झोपण्यासाठी(sleep) बोलावले. पण अय्यम्माने नकार दिला. याच गोष्टीवरून अमरेशला इतका राग आला की त्याने अय्यम्माला कोपर आणि मुक्क्यांनी मारले. जोरदार मार लागल्याने अय्यम्मा तिथेच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोडायकल पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि अहवालात स्पष्ट झाले की हा खुनाचा प्रकार आहे. पोलिसांनी आरोपी अमरेश गुडागुंती याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.बुडागुम्पर डोड्डी गावातील लोक या घटनेने हैराण आणि दु:खी आहेत. अवघ्या दोन वर्षांच्या लग्नात इतके मोठे पाऊल उचलले गेल्याने गावात चर्चेचा माहौल आहे. एका ग्रामस्थाने सांगितले, “पती-पत्नीमध्ये भांडणे तर होतात, पण कोणालाही वाटले नव्हते की हा प्रकार जीव घेण्यापर्यंत जाईल.”
हेही वाचा :
शाळांमध्ये स्काऊट-गाईडची अंमलबजावणी….!
आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…VIDEO VIRAL
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, बँक एफडीपेक्षा मिळेल जास्त परतावा