मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देतोयच, पण आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनेही जागं झालं पाहिजे. त्यामुळे मतचोर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला फटकवा असं उद्धव ठाकरे(political updates) म्हणाले.

बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे असंही ते म्हणाले. मनसे आणि महाविकास आघाडीकडून(political updates) मुंबईत निवडणूक आयोगाच्या मतदारयादीतील भ्रष्टाचाराविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी लोकांना जागृत राहण्याचं आवाहन केलं.
आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे हे जे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आज एवढे सगळे धडधडीत पुरावे दाखवले, तरीही निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही. आपले पक्ष चोरले, नाव चोरले… तेवढंही पुरेसं नाही म्हणून आता मतदारही चोरले जात आहेत.
महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, आजही महाराष्ट्र एकवटला आहे. ज्या गोष्टी आता आम्ही विरोधी पक्ष करत आहोत, तसंच सगळ्या मतदारांनीही जागृत व्हावं आणि मतदार याद्या तपासा. आपलं नाव त्यामध्ये आहे की नाही हे तपासा आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर तुम्हाला माहिती नसलेले किती मतदार आहेत ते तपासा.
उद्धव बाळासाहेब ठाकरे(political updates) अशा नावाने एक ऑनलाईन अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आला. घरातील मतदार रद्द करण्यासाठी त्याने अर्ज केला होता. तो अर्जही बोगस आणि मोबाईल नंबरही खोटा असल्याचं उघड झालं. त्यावर निवडणूक आयोगाने आमच्याकडे येऊन त्याची खातरजमा केली. माझ्या नावाने खोट्या नंबरने ओटीपी करण्याचा प्रयत्न केला गेला, तो 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. यामागे काही षडयंत्र आहे का हे तपासावं लागेल.

आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे हे जे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे.
या सगळ्याचे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणूक आयोग तर लाचार झालाच आहे, पण आता न्यायालय काय करतंय ते पाहू. न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे. आम्ही पुढे जात असताना तुमची साथ हवी आहे.
हेही वाचा :
S*x Toy अन् तसले व्हिडिओ…; लंडनहून यायचा अन् 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत…
राजकीय पटावर आजचा दिवस गाजणार! मतचोरी विरोधात वादळ पेटणार
निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांना मोठा झटका; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय