मतदार यादी घोळाच्या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय(political news) रणसंग्राम पाहायला मिळाला. निवडणूक आयोगाविरोधात मनसे-मविआ सत्याचा मोर्चा काढला. यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह दिग्गज नेते उपस्थित होते आहे. ठाकरे बंधू एकक्ष आले तरी त्यांनी युतीची जाहीर घोषणा केलेली नाही. मात्र, महाष्ट्राला आता सांगायची किंवा जाहीर करायची गरज नाही, युती झाली? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी भाषणत एक असा शब्द वापरला की ज्यावरुन यांची युती झाल्याचे स्षष्ट होते.

लाव रे तो व्हिडिओनंतर ‘काढ रे ते कापड’ असा नारा राज ठाकरेंनी आज लगावला. कापड काढल्यानंतर राज ठाकरेंनी दुबार मतदार याद्यांची थप्पी दाखवली. मुंबईतील सर्व मतदारसंघात दुबार मतदार असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं आणि दुबार मतदार किती आहेत याची संख्यांही मांडली राज ठाकरे यांच्या प्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषा करत मतचोरांना दिसेल तिते फटकवा असं आवाहन केले आहे. राज ठाकरे यांच्या प्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या स्टाईलने काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सयुंक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात पक्षांची एकजूट झालेय. आता ठिणगी पडलेय. या ठिणगीचा वणवा पेटायला वेळ लागणार नाही. आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी, मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आलोय. आम्हाला साथ द्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे युतीची जाहीर घोषणा केल्याची तर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सत्याचा मोर्चामधून ठाकरेंच्या युतीची घोषणा केली गेली. जनतेसाठी एकत्र आलोय, साथ द्या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. सत्याचा मोर्चामधून ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करण्यात आली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे(political news) नावाने अर्ज करण्यात आला आहे. सक्षम नावाच्या एपवरुन माझ्या नावाने अर्ज करण्यात आला आहे. एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतोय. आम्हाला निवडणूका झाल्या पाहिजेत. आधीच निकाल ठरवून निवडणूका लढवल्या जाणार असतील तर जनेतेने ठरवू दे निवडणूका झाल्या पाहिजेत की नाही. मत चोरी विरोधात जनतेने एकत्र आले पाहिजे .

संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदा सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखवल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. या ठिणगीचा कधीही वणवा होऊ शकतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. मतदारांनो आता जागे झालात तर जागे राहा अन्यथा कधिही अॅनाकोंडा येईल असं उद्धव ठाकरे म्हणालेत. राज ठाकरेंनी तर पुराव्यांचा डोंगर दाखवला मात्र तरिही निवडणूक आयोग ऐकत नाही. असा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केलाय. मतचोरी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनीही मान्य केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला..

राज ठाकरेंनी पुरावे सादर केले
मतदार याद्यांवर घरोघरी जाऊन जोरदार काम करा, अशा सूचना राज ठाकरेंनी आजच्या सत्याचा मोर्चा जाहीर सभेत कार्यकर्त्यांना केल्या. इतकंच नाही तर जर दुबार मतदार पुन्हा दिसले तर फोडून काढा असंही राज ठाकरे म्हणाले. पुन्हा दुबार मतदार दिसता कामा नये असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय.

राज ठाकरे यांनी दुबार मतदार याद्यांच्या मोठा ढिग जाहीर सभेत सादर केला. यावेळी राज ठाकरे यांनी सर्व पुरावे सादर केले. फार मोठा विषय नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार सर्वाचजण बोलत आहेत. BJP, शिंदे, NCP सर्वाच पक्षाचे लोक बोलतात दुबार मतदार आहेत. निवडणुकांची घाई कशाला. निवडणूक याद्या साफ करा. मग सर्व गोष्टी असा लपून छपून का सुरु आहेत. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड येथील मतदार आहेत. या मतदारांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथे मतदान केले आहे.

या मतदारांनी त्या मतदार(political news)संघात देखील मतदान केले आहे आणि इथे देखील मतदान केले आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रात की जे या मतदानासाठी वापरले गेले, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. दुबार मतदार दिसले तर, त्यांना बडव बडव बडवा आणि मग पोलिसांच्या हातात द्या.

आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा’ आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्यासाठीचा हा मोर्चा आहे असं म्हणत राज ठाकरेंनी मतदार याद्या साफ करा असा इशारा दिलाय. निवडणुका घेण्याची घाई कशासाठी?’ असा सवाल उपस्थित करत जर पाच वर्षात काही झालं नाही तर अजून एक वर्ष काही निवडणूक झाली नाही तरी चालेल असे म्हणाले.

हेही वाचा :

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आली Good News! सोनं झालं स्वस्त

ज्युनिअर कोण अन् सीनिअर कोण? वादातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या

मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *