नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तळोजा परिसरात एका 10 वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करण्यात आले आहेत. लंडन येथे राहणाऱ्या 70 वर्षीय व्यक्तीने चिमुरडीवर अत्याचार केल्याचे गुरुवारी उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, चिमुकलीच्या आईनेच आरोपीच्या या कृत्यात साथ दिल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांच्या मुलीवर(girl) वारंवार अत्याचार होत होता. गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.

10 वर्षांच्या मुलीचे(girl) लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.त्या तक्रारीवरुन या पथकाने तळोजा परिसरातील एका घरावर छापा टाकला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने मुलीच्या आईला अडीच लाख रुपये व महिना राशन देत असल्याने मुलीची आई तिला रात्री त्या व्यक्तीकडे सोडून परत आपल्या घरी यायची.
गेल्या दोन वर्षांपासून पीडितेवर अत्याचार होत होता. तसंच, या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तिला मारण्याची धमकी द्यायचा. पीडितेची आई रात्री तिला या व्यक्तीकडे सोडून जात असल्याचे सांगितले.त्यानंतर तो व्यक्ती तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करायचा. मागील दोन वर्षांपासून त्याने पीडितेवर अनेकदा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, पीडित अल्पवयीन मुलीची आई व त्या व्यक्तीवर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी न्यायालयाने या दोघांनाही 4 नोव्हेंबरपर्यंतची कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आरोपीच्या घरी केलेल्या छापेमारी केल्यानंतर पोलिसांनी घरातून आक्षेपार्ह वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. यात दारूची बॉटल, लैंगिक शक्ती वाढवण्याच्या गोळ्या, सेक्स टॉय आणि डिजीटल व्हिडिओ रेकॉर्डर तसंच, आरोपीचे कपडे ताब्यात घेतले आहेत.
आम्ही आरोपी आणि पीडितेच्या आईला या गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल अटक केली आहे.हा एक अत्यंत गंभीर गुन्हा आहे. अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीनंतर आम्ही आरोपीच्यी घरातून अनेक अक्षेपार्ह पुरावे जप्त केले आहेत. दोघांवरही पॉस्को कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सखोल चौकशी चौकशी करत आहोत. दोघंही शुक्रवारी न्यायालयात उपस्थित होते आणि त्यांना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :
IPL 2026 मध्ये मोठी अपडेट! युवराज सिंग परतणार…
रस्त्यावर झुंफली मुलींची WWE फाईट, धक्का देताच तरुणी गेली जमिनीखाली… Video Viral
1 नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किती रुपयांची होणार बचत