इचलकरंजी (प्रतिनिधी) – शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरातील पुरवठा कार्यालयात आज लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. पत्रे बसवण्याचे वेल्डिंग काम सुरू असताना ठिणग्या कागदांच्या गठ्ठ्यांवर पडल्याने ही आग(Fire) लागली. कार्यालयात साठवून ठेवलेले एकूण ५१ गॅस सिलिंडर यावेळी मोठ्या संकटाचे कारण ठरू शकले असते, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेच्या वेळी कार्यालयाच्या मागील बाजूस वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी निर्माण झालेल्या ठिणग्या जवळ ठेवलेल्या कागदांवर पडल्या आणि क्षणात आग भडकली. धुराचे लोट उठताच नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत कार्यालयातील सिलिंडर तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवले. यामुळे संभाव्य स्फोटाचा धोका टळला.

या कार्यालयालगतच अपर पोलिस अधीक्षकांचे कार्यालय असल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतकार्यामुळे आग (Fire)अल्पावधीत आटोक्यात आली.घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. जप्त केलेले गॅस सिलिंडर संबंधित गॅस कंपन्यांकडे तातडीने सोपवण्यात आले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही कागदपत्रांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीतून समजते. या घटनेने पुन्हा एकदा शासकीय कार्यालयांतील सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत जनतेचा सवाल — “महापालिकेचे अधिकारी एक दिवस तरी आलिशान गाड्या सोडून दोन चाकीवर फिरून दाखवावेत!”

आजची त्रिपुरारी पौर्णिमा ‘या’ राशींसाठी भाग्यशाली

कांदा न खाल्ल्याने होतात ‘हे’ गंभीर आजार? 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *