आपल्या रोजच्या आहारात कांद्याला एक विशेष स्थान आहे. तो केवळ पदार्थांचा स्वाद वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. मात्र काही लोक धार्मिक कारणांमुळे किंवा चव न आवडल्यामुळे (health)कांदा खाणं टाळतात. पण तुम्हाला माहिती आहे का? कांदा न खाल्ल्याने शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

कांदा ही एक सर्वसाधारण वापरली जाणारी भाजी असून ती जवळपास प्रत्येक भारतीय पदार्थाचा अविभाज्य भाग आहे. कांद्यात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B5, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व घटक शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात.

जर तुम्ही कांदा खाणं बंद केलं तर शरीरात आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे थकवा, कमजोरी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता वाढते. कांदा हा फायबरचा उत्तम स्रोत आहे, जो पचनसंस्था निरोगी ठेवतो. कांदा न खाल्ल्याने फायबरची कमतरता निर्माण होऊन बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

कांद्यात असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच एलिसिन आणि क्वेरसेटिन हे घटक कॅन्सरच्या पेशी तयार होण्यापासून रोखण्यास सहाय्यक ठरतात(health). नियमित कांद्याचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो, तसेच हृदयविकार आणि मधुमेहासारख्या आजारांपासूनही बचाव होतो.

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही एक महिना कांदा खाल्ला नाही, तर शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे लवकर थकवा येतो आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात कांद्याचा समावेश करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

 ड्रॅगन फ्रुट खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे…

तुमच्या फोनमध्ये दडलंय सोनं! अनेकांना ठाऊक नाही याची जागा…

 शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *