महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. (installment) लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत डिसेंबरपर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. महिला आता जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.जानेवारी महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे येतील, असं सांगण्यात येत होतं. मात्र, जानेवारीचा हप्ता अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील,(installment) असं सांगितलं जात होतं. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. ७ तारखेला मतदान आणि ९ तारखेला निकाल लागणार आहे. असा परिस्थितीतही अजूनही योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा हप्ता आता निवडणूकीपूर्वी तरी येणार नाहीये.
लाडकी बहीण योजनेत केवायसीमधल त्रुटींमुळे अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. (installment)महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. आता या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे ४५०० रुपये जमा करण्यात येतील, असं सांगितलं जात आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी