अभिनेत्री शहनाज गिल आणि क्रिकेटर(cricketer) शुभमन गिल यांच्या आडनावातील साम्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांमध्ये चर्चा रंगते — “हे दोघं नातेवाईक आहेत का?” अखेर शहनाज गिलने स्वतः या प्रश्नावर भाष्य करत चाहत्यांची उत्सुकता संपवली आहे.

अलीकडेच पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया याला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने शहनाजला विचारले की, “तू आणि शुभमन गिल लांबचे नातेवाईक तर नाही ना?” हा प्रश्न ऐकताच शहनाज हसत म्हणाली, “मला हा प्रश्न खूप आवडला. तोसुद्धा आमच्या अमृतसरचाच आहे. कदाचित माझा दूरचा भाऊ किंवा चुलत भाऊ असेल. जेव्हा तो ट्रेंड होतो, तेव्हा मीसुद्धा ट्रेंड होते!”

ती पुढे म्हणाली, “भाऊ-बहीण म्हणून काहीतरी कनेक्शन असेलच.” मात्र, तिने कबूल केले की तिने कधीच आपल्या नातेवाईकांना विचारले नाही की ते शुभमनशी(cricketer) संबंधित आहेत का. “मी स्वतःलाच हा प्रश्न विचारला आणि उत्तर मिळालं की कदाचित आमचं भावा-बहिणीचं नातं असेल,” असे ती हसत म्हणाली.

शहनाजने शुभमनबद्दल बोलताना त्याचे कौतुकही केले. “शुभमन खूपच प्रेमळ आहे आणि तो अप्रतिम खेळतो. पण मला विराट कोहली सुद्धा खूप आवडतो. खरं तर विराटमुळेच मी क्रिकेट बघायला सुरुवात केली,” असे शहनाजने सांगितले. शहनाजच्या या candid उत्तराने चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा हशा आणि उत्सुकता निर्माण झाली असून, दोन्ही गिल्समधील हे “कनेक्शन” आता सोशल मीडियावर चर्चेचा नवा विषय बनला आहे.

हेही वाचा :

फक्त 101 रुपये खर्च करा, जिओ देईल Unlimited 5G डेटा, प्लॅन जाणून घ्या

हा नेता शिंदेंची साथ सोडून ठाकरेंकडे; उद्धव म्हणाले, ‘भाजपाला झुकतं…’

दिल्ली बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, कोणाला दिला इशारा?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *