स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं(elections) रणशिंग फुंकलं गेलं असून फॉर्म भरण्यासाठीची मुदत जवळ येत आहे. असं असतानाच स्थानिक पातळीवर बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. त्यातच आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाला उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला आहे. शिंदेंच्या सेनेतील एका मोठ्या नेत्याने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

‘मातोश्री’ या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बीडच्या जनतेच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असून हे काम तुम्ही उत्तम प्रकारे कराल असा विश्वास व्यक्त केला. मुंडेंसाठी शिवसेनेनं बीडबाबत कायम झुकतं माप दिलं. मात्र आता अशी स्थिती नसल्याचं सांगत बीडमध्येही संघर्षाची ठिणगी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पडेल असे संकेत ठाकरेंनी दिलेत.
शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांनी आज मातोश्रीवर ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेत मशाल हाती घेतली. पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत मागील वर्षी जून महिन्यात म्हणजेच साधारण दीड वर्षापूर्वी खाडे यांची शिंदेंच्या शिवसेनेनं हाकलपट्टी केली होती. तेव्हापासून खाडे अस्तित्वासाठी झगडत होते. अखेर आज त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
“काही वेळेला चूक होते. चूक समजून शकतो पण अपराध होता काम नये. रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचललं जाऊ शकतं. लक्षात आल्यावर चूक सुधारली गेली पाहिजे. ती सुधारण्याची संधी दिली पाहिजे. मी मराठवाड्यात दौरा केला. एकूण वातावरण पाहिलं तर महाराष्ट्र आपला कोण याकडे बघतंय. पण तिकडे सत्तेसाठी साठमारी सुरु आहे. तीन साप… प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात प्रत्येकजण एकमेकांना गिळायला बघत आहेत.
अशा परिस्थितीत जनतेकडे कोण बघणार? शेतकरी हताश झाला आहे. नुकसानभरपाई सोडाच त्याला काहीच मिळत नाही. त्याला न्याय आपण मिळवून द्यायचा. शिवसेना मराठीसाठी, हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी सुरु केली. तो उद्देश विसरुन ते सत्तेसाठी तिकडे गेले. मी मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं काही नाही हे शेतकऱ्यांमध्ये मी जातो तेव्हा ते आवर्जून सांगतात,” असं उद्धव ठाकरे म्हणतात.
“एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, असं तुम्ही म्हणालात. मला ही तलवार बघायची आहे. दोन तीन वर्ष नव्हता त्यामुळे तिकडे शिवसेनेची तलवार धारधार आहे की गंजलीये हे मला पुढील काही दिवसात दाखवा. बीडमध्ये आपण मुंडेसाहेबांमुळे भाजपाला झुकतं माप देत होतो. पण आता बीडची पुर्ण विल्हेवाट(elections) लागली आहे. तिकडे कोणीच कोणाचं नाहीये. अशा वेळी सर्वसामान्य जनतेच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. एवढे लोक शिवसेनेत परत आला आहात. तुमच्याकडून जनतेला आणि मला अपक्षा आहे. शिवसेना पूर्वीपेक्षा वैभवशाली हवी. जनता आपल्यासोबत हवी. तुम्ही हे करुन दाखवला असा विश्वास बाळगतो,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :
कोल्हापूर शहरात बिबट्याची एन्ट्री…
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट
दुधी भोपळ्याची साल फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार सालीची चटणी