बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच देशाच्या राजकीय पटावर मोठी हलचल सुरू झाली आहे. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत असून भाजप तब्बल 96 जागांवर आघाडीवर राहून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे जेडीयूनेही 84 जागांवर आघाडी राखत मजबूत उपस्थिती दर्शवली आहे. महाआघाडीला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे ते फक्त 29 जागांवर आघाडीवर आहेत. आरजेडी 25 जागांसह महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर आघाडी मिळाली. या लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेसवर (Congress)टीकेची झोड उठली असून, आरजेडीला फटका बसण्याचे कारण काँग्रेसच असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

बिहार पराभवानंतर आता काँग्रेसला(Congress) महाराष्ट्रातही मोठा धक्का बसला आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी अचानक पक्षाचा राजीनामा जाहीर केला. चोरगे यांनी “वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देतो” असे पत्रात म्हटले असले, तरी ते गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक निवडणुकांमध्ये स्वतःला डावलण्यात आल्याची नाराजी त्यांनी गुप्तपणे व्यक्त केली होती, अशीही चर्चा आहे. बिहारचा परिणाम समोर येताच त्यांनी अचानक राजीनामा देत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही सोडली. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या उंबरठ्यावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने जेडीयू आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर बिहारसोबतच महाराष्ट्रातील काँग्रेसचे राजकीय समीकरणही ढवळून निघत असल्याचे स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा :
काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध, किती धोकादायक आहेत घ्या जाणून
इंडस्ट्रीतील सर्वांत वयस्कर अभिनेत्रीचं निधन; दिलीप कुमार-देव आनंद यांच्यासोबत होते प्रेमसंबंध
‘बिहारच्या पराभवाची किंमत काँग्रेसला महाराष्ट्रात चुकवावी लागेल…’ ठाकरे आक्रमक