हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री(actress) कामिनी कौशल यांच्या निधनाने भारतीय सिनेमाविश्वात शोककळा पसरली आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सात दशकांपेक्षा जास्त काळ अभिनय क्षेत्रात सक्रिय राहिलेल्या कामिनी कौशल या 1940 ते 1960 च्या दशकात प्रमुख अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी अविस्मरणीय कामगिरी केली. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीने एक अनुभवी, प्रतिभावान आणि इतिहासात नोंद होईल अशी कारकीर्द असलेली अभिनेत्री गमावली आहे.

कामिनी कौशल (actress)यांनी 1946 साली ‘नीचा नगर’ या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोच्च ‘पाम डी’ओर’ पुरस्कार जिंकणारा एकमेव भारतीय सिनेमा ठरला, ज्यामुळे त्या क्षणातच एक आश्वासक नवोदित अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. पुढील काळात ‘दो भाई’, ‘शहीद’, ‘नदियाँ के पार’, ‘जिद्दी’, ‘शबनम’, ‘पारस’, ‘आरजू’, ‘जेलर’, ‘नाइट क्लब’ अशा अनेक चित्रपटांत त्यांच्या अभिनयाची छाप दिसून आली.
लाहोरमधील उच्चशिक्षित कुटुंबात उमा कश्यप या नावाने जन्मलेल्या कामिनी यांनी लहानपणीच घोडेस्वारी, भरतनाट्यम, पोहणे, हस्तकला यांसारख्या विविध कौशल्यांवर प्रभुत्व मिळवले होते. नाटक आणि रेडिओ नाटकांतून सुरुवात करत त्यांनी लवकरच सिनेसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. दिलीप कुमार यांच्यासोबतची त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री विशेष गाजली आणि या जोडीबद्दल ऑफस्क्रीनही चर्चांना उधाण आलं होतं.
बहिणीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी भावोजी बी. एस. सूद यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या त्यांच्या परिवारानेही गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
कामिनी कौशल यांच्या निधनाने भारतीय सिनेमाने एक सुवर्णयुगातील तेजस्वी कलाकार कायमचा गमावला आहे.

हेही वाचा :
जसप्रीत बुमराहने मोडला आर अश्विनचा रेकाॅर्ड…
गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड…
OnePlus 15 ची भारतात एंट्री, चाहते झाले आनंदी