बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत प्रभावी कामगिरी केली असून भाजप–जेडीयू आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. या निकालानंतर राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदाबाबत(Chief Minister) उत्सुकता वाढली आहे. जरी एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली असली तरी अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचेही नाव घोषित करण्यात आले नव्हते. दरम्यान, या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर विश्वास टाकल्याचे नमूद केले.

फडणवीस म्हणाले की, “बिहारच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. चिराग पासवान, मांझी आणि इतर घटकपक्षांसह आमच्या युतीला जनता भरभरून साथ देत आहे.” काँग्रेसवर टीका करताना त्यांनी राहुल गांधींच्या ‘विषारी प्रचाराला’ जनता उत्तर देत असल्याचे सांगितले आणि काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही नमूद केले.

बिहारचा मुख्यमंत्री कोण होईल या प्रश्नावर फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, “नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली आहे. पुढील मुख्यमंत्रीपदाचा(Chief Minister) निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार घेतील. यावर बोलण्याचा मला अधिकार नाही.” यापूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांकडेच असल्याचे सांगितले होते.

एकूणच, निकालानंतर बिहारच्या राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरू झाली असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

कुलदीप यादवचा मोठा कारनाम! जडेजा-झहीर खानचा विक्रम मोडत क्रिकेटमध्ये रचला इतिहास 

पराभव बिहारमध्ये, पण भूकंप महाराष्ट्रात, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

शरद पवारांना एकापाठोपाठ २ सर्वात मोठे धक्के!


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *