सौदी अरेबियातील मदिना येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. भारतीय(Indians) वेळेनुसार रात्री 1.30 वाजता बद्र–मदिना महामार्गावर प्रवासी बस आणि डिझेल टँकरची जोरदार धडक होऊन प्रचंड स्फोट झाला. या स्फोटानंतर बसने पेट घेतला आणि आत असलेल्या प्रवाशांपैकी अनेक जण जागीच होरपळून मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे.या बसमध्ये मक्का येथे दर्शन घेऊन मदिना येथे परतणारे भारतीय भाविक प्रवास करत होते. ही बस डिझेल टँकरला धडकल्यानंतर काही सेकंदांतच ज्वाळांनी वेढली गेली. त्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये 42 भारतीय प्रवासी होते आणि सर्वांच्या मृत्यूची भीती वर्तविण्यात येत आहे.

या भीषण अपघातासंबंधी अद्याप स्थानिक प्रशासनाने अधिकृत मृत्यूची संख्या जाहीर केलेली नाही. मात्र मदिना यात्रेचे आयोजन करणाऱ्या टूर ऑपरेटरकडून आतापर्यंत 10 भारतीयांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृतांमध्ये 20 महिला आणि 11 लहान मुलांचा समावेश असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.हैदराबाद आणि तेलंगणा येथील प्रवाशांचा या बसमध्ये मोठा समावेश होता. मक्का दर्शन पूर्ण करून ते मदिना येथे परतत होते. डिझेल टँकरला बसची धडक होताच भयंकर स्फोट झाला आणि काही क्षणांतच बस जळून खाक झाली. बसचे दार आणि काचांच्या भागांनी स्फोटानंतर विकृती घेतल्याने प्रवाशांना बाहेर पडणे अशक्य झाले.
दुर्घटनास्थळी स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने दाखल झाली असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांची ओळख पटवणे हे मोठे आव्हान ठरत आहे, कारण बस (Indians)पूर्णतः जळून गेली आहे. त्यामुळे शवांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीची शक्यता नाकारता येत नाही.या दुर्घटनेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती मिळावी म्हणून स्वतंत्र कंट्रोल रूम स्थापन करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाशी सतत संपर्कात राहण्याचे निर्देशही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सौदी अरेबियातील स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास या घटनेचा तपशील गोळा करत असताना, अधिकृत मृत्यूची संख्या जाहीर करण्यास काही वेळ लागू शकतो. तथापि, प्राथमिक अहवालांनुसार ही दुर्घटना अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय नागरिकांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची भीती संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण निर्माण करणारी आहे.

हेही वाचा :
आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा 24 कॅरेटचा दर
बिबट्यांची दहशत वाढली! पण उपाययोजना कठीण!
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला अटक…