आज सोनं-चांदीच्या(Gold) दरात पुन्हा एकदा घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन पुन्हा स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी डॉलरची घसरण यामुळं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. डॉलर 0.14 टक्क्यांनी वाढून स्थिरावला आहे. त्यामुळं त्याचा परिणाम सोन्याची मागणी किंवा किंमतीवर पाहायला मिळाले. तर, देशांतर्गंत बाजारातदेखील सोनं-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

देशांतर्गंत सराफा बाजारात आज सोन्याच्या(Gold) दरांबाबत बोलायचे झाल्यास शनिवारच्या तुलनेत किंचितशी घसरण झाली आहे. आज देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 12,497 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. तर, देशात चांदीच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास सराफा बाजारात चांदीच्या दरात घट झाली आहे. आज देशात चांदीचा भाव 1,67,000 रुपये प्रतिकिलोग्रॅम इतका आहे. म्हणजे शनिवारच्या तुलनेत 2 हजारांची घट झाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 1,24,970 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली असून 24 कॅरेट प्रतितोळा 1,14,550 इतकी आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घट झाली असून 93,730 रुपयांवर स्थिरावली आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

  • 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,14,550 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,24,970 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,730 रुपये

  • 1 ग्रॅम सोनं किंमत
    1 ग्रॅम 22 कॅरेट 11,455 रुपये
    1 ग्रॅम 24 कॅरेट 12,497 रुपये
    1 ग्रॅम 18 कॅरेट 9,373 रुपये
  • 8 ग्रॅम सोनं किंमत
    8 ग्रॅम 22 कॅरेट 91,640 रुपये
    8 ग्रॅम 24 कॅरेट 99,976 रुपये
    8 ग्रॅम 18 कॅरेट 74,984 रुपये
  • मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,14,550 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,24,970 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,730 रुपये

हेही वाचा :

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला अटक…

महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा…

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 1 डिसेंबरपासून ‘ही’ सेवा बंद होणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *