कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
महाराष्ट्रात, विशेषतः साखर पट्टा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची(Leopard) दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बिबट्यांचे लोकांवरील हल्ले वाढू लागले आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. गळ्यात लोखंडी खिळे असलेला पट्टा घालून बाहेर पडावे लागते आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रचलित कायद्यानुसार उपाययोजना करणे कठीण आहे. इसवी सन 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये दुरुस्ती केली तरच बिबट्यांची दहशत रोखता येणार आहे.इसवी सन 1927 च्या वन कायद्यान्वये जंगले आणि त्यांच्या परीसीमा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. जंगलाची नेमकी व्याख्या या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. मात्र जंगलामध्ये राहणाऱ्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी, त्यांची होणारी शिकार थांबवण्यासाठी केंद्र शासनाने इसवी सन 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा अमलात आणला. त्यामध्ये व्याघ्र कुळातील, मार्जार कुळातील वन्य प्राण्यांना समाविष्ट करण्यात आले.

याशिवाय इतर वन्य प्राण्यांची(Leopard) सूची करण्यात आली. सर्व प्रकारचे वन्यजीव हे शिकारीसाठी प्रतिबंधित करण्यात आले. अगदी अलीकडच्या काळात व्हेल माशाची उलटी तिच्या किमतीमुळे चर्चेत आल्यानंतरव्हेल माशाची शिकार होऊ नये म्हणून त्याचा समावेश 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये करण्यात आला.वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये बिबट्यांना संरक्षित करण्यात आलेले आहे. त्याच्या शिकारीला प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यासाठी सश्रम कारावास आणि दंड या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पण तरीही बिबट्यांना सावज करण्यात येत होते. त्याची चोरटी शिकार होत होती. पण तेव्हा हे बिबटे जंगलाच्या अधिवासात राहत होते. ते मानवी वस्तीकडे फिरकत नव्हते.पण आता बिबट्यांची संख्या भरमसाठ वाढल्यामुळेएक नवीन गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पुणे शहर, मंचर, हवेली, जुन्नर हा ग्रामीण परिसर तसेच अहिल्यानगर आणि तेथील ग्रामीण परिसर, मराठवाड्यातील अकोलातसेच कोल्हापूर या साखरपट्ट्यात बिबटे मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत.
रस्त्यावरून, गल्लीबोळातूनजशी भटकी कुत्री दिसतात तसेच बिबटे दिसू लागले आहेत. या बिबट्यांनी माणसावर हल्ले सुरू केले आहेत. 50 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पहिल्यांदाच घडताना दिसते आहे. पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी बिबट्याने माणसावर हल्ला करण्याचे प्रकार क्वचित घडत होते. त्याला चंद्रपूर जिल्हा अपवाद होता. कारण चंद्रपूर मध्ये वन्य पशु आणि माणूस यांच्यातील संघर्ष वारंवार उघड होताना दिसतो आहे. पण आता इतर जिल्हेही बिबट्यांच्या दहशतीखाली येऊ लागले आहेत.समोरून बिबट्या येत असेल तर लोकांनी आहे तिथेच निश्चल उभे राहिले तर बिबट्या हल्ला करत नाही.बिबट्या किंवा पट्टेरी वाघ हे आकाशाकडे पाठ असलेल्या जीवांचीच शिकार करत असतात. उभा असलेला माणूस हा त्याच्यासाठी महत्त्वाचा नसतो.
पण शेतामध्ये स्त्रिया किंवा पुरुष खाली वाकून किंवा खाली बसून कामे करत असतात तेव्हाच तो हल्ले करतो. उभा असलेल्या माणसाकडे तो निरखून बघतो आणि निघून जातो.बिबट्याने गेल्या दोन महिन्यात ज्यांच्यावर हल्ले केले आहेत ते सर्वजण शेतात काम करत होते. कारण ते बिबट्याच्या “आय व्हयू” मध्ये येत होते.अहिल्यानगर ग्रामीण भागात बिबट्यांचे हल्ले वाढल्यानंतर तेथील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. बिबट्यांची(Leopard) दहशत थांबवा त्यांना गोळ्या घाला अशी या निदर्शकांची मागणी होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बिबट्यांनावन्यजीव शेड्युल एक मधून वगळण्यात यावे असे म्हटले आहे.
तसे झाले तरच बिबट्यांना गोळ्या घालता येऊ शकतात. ही मागणी केंद्र शासनाच्या वनविभागाकडून मान्य झाली पाहिजे. यासंदर्भात राज्य शासनाने केंद्रीय वन विभागाशी संवाद साधला आहे.वन्यजीव 1972 च्या कायद्यात दुरुस्ती केली गेली तरच बिबट्यांची दहशत थांबवण्यासाठी राज्य शासनाला कठोर उपाय योजना करता येऊ शकतात.पण ही दुरुस्ती सहजासहजी होईल किंवा ती लगेच होईल असे नाही. पण तोपर्यंत ग्रामीण भागातील लोकांनी बिबट्यांपासून आपले संरक्षण कसे करायचे हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने स्वतःच खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आणि पर्याय आहे.

हेही वाचा :
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला अटक…
महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा…
SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 1 डिसेंबरपासून ‘ही’ सेवा बंद होणार