उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिसांनी एका धाडसी फसवणूक प्रकरणात दिव्यांशी चौधरी नावाची महिला अटक केली आहे, जिने मागील काही वर्षांपासून पुरुषांना फसवून कोट्यवधी रुपये उकळले. तपासात समोर आले आहे की, दिव्यांशीने चार लग्न केली असून, 12 पेक्षा जास्त पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवले. ती अत्यंत चलाख असून, पुरुषांशी आधी मैत्री करून प्रेमसंबंध प्रस्थापित करते, नंतर लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवते(cheated) आणि अचानक बलात्काराचा खोटा आरोप करून FIR नोंदवते. पीडित गबगबून तोडजोडीसाठी तयार होतो, त्यावेळी दिव्यांशी त्याच्याकडून मोठ्या रकमेची वसुली करते.

पोलीस तपासात समोर आले आहे की, दिव्यांशीच्या 10 बँक खात्यांमध्ये मागील काही वर्षांत 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. त्यातील काही रक्कम मेरठ झोनमधील पोलीस अधिकारी, एक इंस्पेक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर करण्यात आली, यावरून दिसते की तिचा एक मोठा नेटवर्क आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारींमध्ये दिसून आले की, तिने आधी दोन बँक मॅनेजरांना अशाच खोट्या FIR द्वारे फसवले आणि तडजोडीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले.
अलीकडेच दिव्यांशीने कानपूरचे पोलीस कमिश्नरकडे पोलीस अधिकारी आदित्य लोचनविरुद्ध तक्रार केली, जिथे तिने त्याच्यावर खोटा लग्नाचा दावा केला आणि पैसे हडपल्याचा आरोप केला(cheated). तपासात हे आरोप खोटे ठरले, तर आदित्यने सांगितले की, दिव्यांशी त्याला अनेक मार्गांनी पैसे देण्यासाठी भाग पाडत होती आणि अनेकदा धमकावलीही. दिव्यांशीने आतापर्यंत डझनभर पुरुषांना फसवल्याचे तपासात समोर आले असून, तिच्या संपूर्ण नेटवर्कचा वेगाने शोध सुरू आहे.

हेही वाचा :
नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…
लाँच होण्याआधीच Redmi 15C 5G स्मार्टफोनची किंमत लीक