रेडमीचा लोकप्रिय बजेट स्मार्टफोन(smartphone) Redmi 15C 5G लवकरच भारतीय बाजारात पदार्पण करण्यास सज्ज असून, लाँचपूर्वीच त्याची संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले आहेत. ताज्या लीकनुसार, हा स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार असून बेस मॉडेलची किंमत सुमारे ₹11,500 पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक बाजारात आधीच सादर करण्यात आलेल्या या मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट आणि दमदार 6000mAh बॅटरीची साथ पाहायला मिळाली होती, आणि भारतातही याच फिचर्सची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा आहे.

Redmi 15C 5G च्या भारतीय व्हेरिएंटमध्ये 4GB/128GB, 6GB/128GB आणि 8GB/128GB अशा तीन कॉन्फिगरेशन असू शकतात, ज्यांच्या किंमती अनुक्रमे ₹11,500, ₹12,500 आणि ₹14,500 असू शकतात. फोनमध्ये 6.9-इंचाचा HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळण्याची दाट शक्यता आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाले तर, यात 50MP प्रायमरी सेन्सर, एक सेकंडरी लेन्स आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. डिव्हाइस 1TB पर्यंत स्टोरेज एक्सपांड करण्यास सक्षम असून 33W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरीने सुसज्ज असू शकते.

या फोनचे डस्क पर्पल, मिडनाईट ब्लॅक(smartphone) आणि मिंट ग्रीन हे तीन रंग पर्याय भारतातही उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. ब्लूटूथ 5.4, वाय-फाय, 3.5mm हेडफोन जॅक आणि संभवित IP64 रेटिंगमुळे हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये मजबूत स्पर्धा देणार असल्याचे तंत्रज्ञान तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

इंदुरीकर महाराज वादात! ‘त्या’ विधानामुळे लोकांच्या भावना अधिक चिघळल्या!

200 कोटींचं अमिष आणि 30 कोटींची फसवणूक; सुप्रसिद्ध दिग्दर्शक व त्यांच्या पत्नीसह 8 जणांविरोधात FIR

राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करा…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *