गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहे. असे असताना आता विवाहाचे आमिष(promise) दाखवून तीन महिलांवर अत्याचार करण्यात आल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना पुण्यात घडल्या आहेत.

या अत्याचारप्रकरणी कोंढवा, हडपसर आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलिसांनी विवाहाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अनिकेत राकेश निकाळजे (वय २१, रा. एसआरए वसाहत, कमेला, कोंढवा) याला अटक केली आहे. पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, आरोपी निकाळजेने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तिला धमकावले.

तसेच हडपसर भागातही विवाहाचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक सरक (रा. सिद्धीविनायक सोसायटी, घुलेनगर, मांजरी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला, ज्यामुळे ती गर्भवती(promise) झाली. लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने टाळाटाळ केली.

तिसऱ्या घटनेत, सहकारनगर पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रुपेश बाळू साळवे (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी साळवेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. महिलेने लग्नाबद्दल विचारल्यावर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

भोंदूगिरीचा आधार घेत एका महिलेवर तब्बल 14 वर्षे लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इतकेच नाहीतर पीडित महिलेची ५० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचेही समोर आले.

हेही वाचा :

लोकांना”पागल”करणारं राजकारणातलं “कागल”

कॉफीमध्ये हा घटक मिक्स करून प्या आणि मिळवा असंख्य फायदे

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! E-KYC संदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *