नोकरीला जाणाऱ्या किंवा नोकरीवरून निवृत्त झालेल्या, त्यातही सरकारी अख्तयारितील एखाध्या खात्यातून निवृत्त झालेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन लागू होतं. नुकत्याच करण्यात आलेल्या कही तरतुदी पाहता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर येणारी पेन्शनची(Pension) रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओ हा निर्णय घेऊ शकते.

EPFO कडून निवृत्ती वेतनाशी संबंधित हा मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली असून सध्या त्याबाबतची आकडेमोडही अनेकांचं लक्ष वेधत आहे.जिथं, ईपीएफओकडून वेतन मर्यादा 15000 रुपयांवरून 25000 रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं ही रक्कम नेमकी कधी वाढणार याचीच अनेकांना प्रतीक्षा आहे.
राहिला मुद्दा या बदलाचा थेट फायदा कोणाला होणार, तर हा बदल लागू झाल्यास देशातील एक कोटींहून अधिक कामागार ईपीएस पेन्शनच्या (Pension)कक्षेत येऊ शकतात.प्राथमिक स्वरुपात सध्या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (ईपीएस) पेन्शनची गणना करण्यासाठी वेतन मर्यादा प्रति महिना 1500 रुपये इतकी आहे.
थोडक्यात एखाद्या कामगाराचा पगार 25 किंवा 40 हजार रुपये असले तरीही पेन्शन योगदान आणि त्यानंतर मिळणारी पेन्शन रक्कम ही फक्त 15000 रुपये वेतनाच्याच आधारावर ठरते. 2014 मध्ये ही मर्यादा 6500 वरून 15000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. ज्यानंतर साधारण 11 वर्षे त्यात कोणताच बदल करणयात आलेली नाही. ज्यामुळं आता वेतन मर्यादा वाढण्यास पेन्शनची रक्कमसुद्धा वाढणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचा :
गरोदर महिलेला स्कुटरने ओढत नेलं, पोलिसांकडूनच घडले गैरवर्तन; Video Viral
‘या’ पाच ट्रिक्सच्या मदतीने कोथिंबीर ठेवा फ्रेश अन् हिरवीगार…
सरकारी नोकरदारांनो… सेवानिवृत्तीचं वय वाढवलं जाणार