भारतीय जेवणात कोथिंबीर(Coriander) वापरणे जवळजवळ अपरिहार्य आहे, मात्र बाजारातून खरेदी केलेली कोथिंबीर काही दिवसांत पिवळी पडणे आणि सुकणे हा सामान्य त्रास असतो. अनेकदा कोथिंबीरचा वास आणि ताजेपणा कायम ठेवणे कठीण जाते. मात्र काही सोप्या घरगुती उपायांनी कोथिंबीर दीर्घकाळ ताजी ठेवता येते.

कोथिंबीर(Coriander) स्वच्छ निवडून धुऊन, कापडावर किंवा टिश्यू पेपरवर पसरवून पूर्णपणे वाळवावी. ओलावा पाने खराब होण्याचे मुख्य कारण असल्याने कोथिंबीर कोरडी ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर हवाबंद डब्यात तळाशी आणि वर टिश्यू पेपर ठेऊन कोथिंबीर पसरवून झाकण बंद करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ती बराच दिवस ताजी राहते. तसेच, कोथिंबीर देठांसह पाण्याच्या भांड्यात ठेवणे देखील उपयुक्त ठरते; यासाठी ग्लास किंवा बाटलीत थोडे पाणी भरून कोथिंबीर त्यात ठेवून हलके झाकण ठेवावे.
जर कोथिंबीर मुळांसह खरेदी केली असेल, तर मुळे पाण्याने धुवून टिश्यूमध्ये गुंडाळून किंवा हवाबंद पिशवीत ठेवणे फायदेशीर ठरते. हे पद्धती मुळे ओलावा टिकवून ठेवतात आणि पाने लवकर सुकत नाहीत. शिवाय, पॉलीबॅगमध्ये साठवताना लहान छिद्रे करणे गरजेचे आहे, जेणेकरून हवा फिरू शकेल आणि बुरशीची शक्यता कमी होईल. या सर्व उपायांनी कोथिंबीर अधिक दिवस ताजी, सुवासिक आणि स्वादिष्ट ठेवता येते.

हेही वाचा :
सरकारी नोकरदारांनो… सेवानिवृत्तीचं वय वाढवलं जाणार
महागड्या पेट्रोल डिझेल कार्सवर येणार बंदी…
वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत