जगभरात अनेक जण डिसेंबर महिन्याचे सेलिब्रेशन आणि प्लॅनिंग करत असताना, आता एक धक्कादायक दावा समोर आला आहे. जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्त्रेदमस यांच्या भविष्यवाण्यांचे(prediction) तज्ज्ञांनी केलेले विश्लेषण लोकांना हादरवून सोडत आहे.

दाव्यानुसार, नॉस्त्रेदमस यांनी 2025 च्या अखेरपूर्वी युद्ध, लघुग्रहाचा धोका आणि नवीन महामारीचा उद्रेक होण्याचा इशारा शेकडो वर्षांपूर्वीच दिला होता.
इंग्लंडपासून जगभर संघर्ष?
तज्ज्ञांच्या मते, नॉस्त्रेदमस यांनी इंग्लंडमध्ये संघर्ष सुरू होईल असा उल्लेख केला आहे. याचबरोबर जागतिक तणाव वाढत जाऊन मोठ्या युद्धाची शक्यता त्यांनी नोंदवली होती.
काही विश्लेषकांचा असा विश्वास आहे की ही भविष्यवाणी रशिया-युक्रेन युद्धाच्या समाप्ती आणि नव्या संघर्षाच्या सुरुवातीशी जोडली जाऊ शकते.
नवीन महामारीचा धोका?
सगळ्यात भीतीदायक बाब म्हणजे महामारीविषयी केलेला इशारा. नॉस्त्रेदमस यांच्या शब्दात —
“भूतकाळातील एक मोठी महामारी पुन्हा येईल, आणि पूर्वीपेक्षा अधिक घातक रूप घेईल.”
या वाक्यामुळे 2020 च्या कोरोनानंतर जग पुन्हा अशा संकटाला सामोरे जाईल का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
लघुग्रहाचा इशारा
फक्त युद्ध आणि महामारीच नव्हे, तर पृथ्वीवर एका मोठ्या लघुग्रहाच्या टक्करचीही शक्यता नॉस्त्रेदमस यांनी व्यक्त केली होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा घटनेमुळे मानवजीवन आणि हवामानात मोठे बदल घडू शकतात.
राजकारणात उलथापालथ?
भविष्यवाण्यांमध्ये(prediction) एक मजकूर विशेष लक्षवेधी आहे —
“जुने साम्राज्य कमजोर होतील आणि नवी शक्ती उदयास येईल.”
याचा अर्थ पश्चिमी देशांचा प्रभाव कमी होणार असून, नव्या राष्ट्रांची ताकद वाढू शकते.

हेही वाचा :
‘शिंदेंचं फडणवीसांशी जमत नाही’ म्हणत मोठं विधान; ‘शिंदेंचे किमान 35 आमदार भाजपामध्ये…’
50-60 तासाने होणार विनाश? उपसागरात चक्रीवादळ
‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय