महाराष्ट्राचे माजी रणजीपटू निकोलस सलदान्हा यांचे वयाच्या 83व्या वर्षी पुण्यात निधन झाले(cricketer). नाशिकमध्ये 23 जून 1942 रोजी जन्मलेले सलदान्हा हे उजव्या हाताचे फलंदाज आणि डावखुरे फिरकीपटू म्हणून ओळखले जात होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी तब्बल 57 प्रथम श्रेणी सामने खेळत 2,066 धावा केल्या आणि 138 बळी घेतले. त्यांचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 142 होती, तर फलंदाजीची सरासरी 30.83 इतकी होती.मैदानावरील चपळ फिल्डिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या सलदान्हा यांनी कारकिर्दीत 42 झेल घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर एक शतक नोंद आहे.

गोलंदाजीत त्यांनी सहा वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले असून, त्यांची गोलंदाजीची सरासरी 22.48 होती. सर्वोत्तम कामगिरी म्हणून त्यांनी एका डावात 41 धावांत 6 बळी घेतले होते.निकोलस सलदान्हा यांच्या क्रिकेट(cricketer) कारकिर्दीकडे पाहिल्यास, त्यांनी महाराष्ट्रासाठी 57 प्रथम श्रेणी सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्यांनी गोलंदाजीत दमदार कामगिरी करत 138 बळी टिपले. यामध्ये 6 वेळा त्यांनी एका डावात पाच बळी घेतले, मात्र दहा बळींचा टप्पा त्यांना गाठता आला नाही.

त्यांच्या गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीत त्यांनी एका डावात केवळ 41 धावांत 6 बळी घेतले होते.फक्त गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही सलदान्हा चमकले. प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यांच्या नावावर एक शतकासह एकूण 2,066 धावा जमा आहेत. 76 डावांत त्यांनी 30 च्या सरासरीने धावा केल्या असून, 142 धावांची त्यांची खेळी ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. याशिवाय, त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना 42 झेलही घेतले होते.महाराष्ट्र क्रिकेट संघाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले, “निकोलस हे एक समर्पित आणि बहुआयामी खेळाडू होते.
त्यांनी महाराष्ट्र क्रिकेटला दिलेले योगदान अमूल्य आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि उत्कृष्ट खेळभावना यासाठी ते कायम लक्षात राहतील.”जरी सलदान्हा यांना कधीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही, तरी त्यांनी महाराष्ट्राशिवाय इतर कोणत्याही संघासाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळले नाही. त्या काळातील ते महाराष्ट्राचे प्रमुख ऑलराउंडर मानले जात होते.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल