भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी (actress)आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. पत्नी धनश्री वर्मासोबत चार वर्षांच्या लग्नानंतर 2025 मध्ये त्याने घटस्फोट घेतला होता. घटस्फोटामागचं नेमकं कारण दोघांनीही स्पष्ट केलं नव्हतं, मात्र पोटगी आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये राहण्यावरून वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्यानंतर चहलचं नाव आरजे महवशसोबत जोडलं गेलं आणि दोघे एकत्र फिरताना देखील दिसले होते.

आरजे महवशनंतर अभिनेत्री शेफाली बग्गासोबत नाव जोडले मात्र आता (actress)आरजे महवशसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चांदरम्यान चहल थेट एका अभिनेत्रीसोबत स्पॉट झाला आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली बग्गा हिच्यासोबत तो मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे.आरजे महवशने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अप्रत्यक्ष आरोप केले होते, त्यानंतर चहलनेही प्रतिक्रिया न देण्याचा मार्ग निवडला. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने ब्रेकअपच्या चर्चांना अधिक बळ मिळालं.

अशातच आता चहल शेफाली बग्गासोबत दिसल्यामुळे त्याच्या (actress)आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे.मुंबईत स्पॉट झाल्यानंतर पापाराझींना पाहताच शेफाली बग्गा थोडी दूर जाऊन उभी राहिली आणि फोटोसाठी पोझ देण्याचं टाळलं. मात्र तरीही दोघांचे फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता युजवेंद्र चहल आणि शेफाली बग्गा यांच्यात नेमकं काय नातं आहे, याबाबत दोघांकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

आरसीबी आयपीएल टीम अदर पुनावाला खरेदी करणार?

या महिलेवर जीव ओवाळून टाकतात पुतिन, देते थेट आदेश

QR कोड आणि 6 डिजिट PIN; आता मुलांच्या WhatsAppवर राहील पालकांची नजर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *