भारत-पाकिस्तानच्या अंडर-19 वनडे विश्वचषक 2026 मधील लढतीने पुन्हा एकदा (Pakistan) क्रिकेटप्रेमींना रोमांच अनुभवायला लावला. उपांत्य फेरीसाठी निर्णायक ठरलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 58 धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपली दावेदारी अधिक भक्कम केली. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली, मात्र युवा भारतीय संघाने दबाव झुगारून 49.5 षटकांत 252 धावांचा स्पर्धात्मक डाव उभारला.

पाकिस्तानसमोर (Pakistan) हे लक्ष्य 33.3 षटकांत गाठण्याचे आव्हान होते, पण भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत त्यांच्या फलंदाजीची कोंडी केली. मधल्या षटकांमध्ये पाकिस्तानचा डाव कोलमडला आणि भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. उपकर्णधार विहान मल्होत्राने सहावी विकेट घेताच सामन्याचे चित्र स्पष्ट झाले.
सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशी आणि पाकिस्तानी (Pakistan) खेळाडू यांच्यात थोडा तणाव निर्माण झाला, मात्र विहानने मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली. याआधीच्या स्पर्धांमध्येही वैभवला स्लेजिंगचा सामना करावा लागल्याने तो भावनिक झाल्याचे बोलले जात आहे.
या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून 4 फेब्रुवारीला अफगाणिस्तानविरुद्ध सामना रंगणार आहे. युवा भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम ठेवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये ‘महाभारत’ फेम अभिनेते साकारणार मिर्झा राजे जयसिंग
सनी देओल स्टारर ‘बॉर्डर’ पाहताना 59 जणांचा मृत्यू, आग… सर्वत्र धुराचे लोट…चिंगराचेंगरी…, तेव्हा नक्की काय घडलेलं?
भाजपच्या घोटाळ्यांच्या फाईल्सबद्दल बोलले अन् 13 दिवसात..; अजित पवारांचा मृत्यू की घातपात? संजय राऊतांचे 5 खळबळजनक सवाल