पाणीपुरी हा सर्वांचाच आवडता विषय. पाणीपुरीचे साधे नाव जरी काढले (woman’s)तरीही तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी खाण्याची मजाच काही वेगळी आहे. त्यामध्येच महिलांचा पाणीपुरी का सर्वात मोठा विक पॉईंट आहे. पाणीपुरीच्या गाड्यावर आपण बघितले तर पुरूषांपेक्षा अधिक गर्दी कायमच महिलांची असते. मात्र, नुकताच पाणीपुरी खाताना एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजक घटना घडली. एका महिलेच्या जीवावर पाणीपुरी खाणे बेतले आहे. महिला मस्त आपली मजेत पाणीपुरी खात होती. मात्र, अचानक असे काही घडले की, तिची तब्येत इतकी जास्त बिघडली की, तिला थेट रूग्णालयात दाखल करावे लागले. पाणीपुरी आनंदात खात असताना महिलेचा अचानक जबडा अडकला. तिला प्रचंड वेदना सुरू झाल्या. अनेक प्रयत्न करूनही महिलेचा जबडाखाली होत नव्हता.

पाणीपुरी खाताना महिलेने तोंड मोठे केले. मात्र, त्यानंतर तिचा (woman’s)जबडा अनेक प्रयत्न करूनही खाली येत नव्हता. उत्तर प्रदेशच्या औरैयाच्या दिबियापूर पोलिस स्टेशन परिसरातील गौरी किशनपूर काकोर येथील रहिवासी असलेल्या इंकला देवी या त्यांची भाची आणि सुनेची प्रसूतीसाठी कुटुंबासह औरैया जिल्हा रुग्णालयाजवळ थांबल्या होत्या. यादरम्यान सर्वांनी पाणीपुरी खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्वजण पाणीपुरीच्या गाड्यावर पोहोचले.
यावेळी इंकल देवी यांनी प्लेटमधील मोठी पाणीपुरी उचलली (woman’s)आणि खाण्यासाठी तोंड उघडले. मात्र, त्यानंतर पाणीपुरी तोंडात ठेवल्यानंतर त्यांचा जबडा खाली येत नव्हता. त्यांनी तोंड बंद करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांचे तोंड बंदच झाले नाही. अनेक प्रयत्न करूनही त्यांचा जबडा खाली आलाच नाही. यावेळी इंकल देवी यांच्या नातेवाईकाने सांगितले की, अगोदर मस्त हसी मजाक सुरू होता.

सर्वजण आनंदाने पाणीपुरी खात होते. मात्र (woman’s), जबडा खाली येत नसल्याने त्यांनी प्रचंड त्रास सुरू झाला आणि वेदनेने त्या रडत होत्या. तातडीने इंकल देवी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.जिल्हा रुग्णालयातील डॉ. मनोज कुमार यांनी म्हटले की, इंकल देवी यांचा जबडा पूर्णपणे निखळला होता. आम्ही अनेक वेळा मॅन्युअली कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्हाला यश आले नाही. शेवटी त्यांना सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये रेफर करण्यात आले. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात अशी केस कधीच बघितली नाही. शेवटी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी
हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास