हिवाळा सुरू होताच तापमानात अचानक घट होते आणि (winter)त्याचा थेट परिणाम शरीराच्या रक्ताभिसरण प्रणालीवर दिसू लागतो. या थंडीमुळे धमन्या आकुंचन पावतात, रक्त प्रवाह मंदावतो आणि शरीरातील रक्त गोठण्याची शक्यता वाढते. परिणामी, मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे विशेषतः हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांना थंडीच्या दिवसांत जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात अनेक जण पाण्याचे सेवन कमी करतात, व्यायाम कमी करतात आणि थंडीपासून बचावासाठी जाड कपडे घालूनही शरीराची हालचाल कमी करतात. या सर्व गोष्टींमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. तापमानातील बदलामुळे रक्तदाब अचानक वाढणे, डिहायड्रेशन होणे आणि प्रदूषण वाढल्याने श्वसनातील ताण वाढणे ही सर्व कारणे स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत वाढ घडवतात.

ब्रेन स्ट्रोकचे मुख्य दोन प्रकार असतात. इस्केमिक स्ट्रोक (winter)आणि रक्तस्रावी स्ट्रोक. इस्केमिक स्ट्रोकमध्ये रक्ताच्या गुठळ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात आणि मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही. यामुळे मेंदूच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने त्या वेगाने नष्ट होतात. दुसऱ्या प्रकारात, म्हणजे रक्तस्रावी स्ट्रोकमध्ये, मेंदूतील रक्तवाहिनी फुटते आणि अंतर्गत रक्तस्राव होतो. हिवाळ्यात या दोन्ही प्रकारातील स्ट्रोकचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
नवी मुंबईतील न्यूरोसर्जन यांच्या मते, स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे दिसताच(winter) रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणे अत्यंत गरजेचे असते. सीटी स्कॅन आणि एमआरआय यांच्या मदतीने डॉक्टरांना स्ट्रोकचा प्रकार आणि मेंदूतील प्रभावित स्थान ओळखणे सोपे होते. इस्केमिक स्ट्रोकमध्ये काही तासांत रक्तप्रवाह पुन्हा सुरू करण्यासाठी टीपीएसारख्या क्लॉट-बस्टिंग औषधांचा वापर प्रभावी ठरतो. तर रक्तस्रावी स्ट्रोकमध्ये काही वेळा शस्त्रक्रियाच करावी लागते.

हिवाळ्यात स्ट्रोकची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे अचानक (winter)अशक्तपणा जाणवणे, चेहरा वाकडा होणे, हात-पायात कमजोरी, बोलताना अडचण येणे किंवा दृष्टी धूसर होणे. हे लक्षणे BEFAST या संक्षेपानेही ओळखले जातात. Balance, Eyes, Face, Arm, Speech, Time. यापैकी कोणतेही लक्षण दिसताच वेळ न दवडता तज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे, कारण स्ट्रोकचे ‘गोल्डन अवर्स’ म्हणजे पहिल्या 3-4 तासांत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो आणि दीर्घकाळाचा अपंगत्व टाळता येतो. तज्ज्ञांच्या मते, जवळपास 80% स्ट्रोक योग्य वेळी जागरूकता आणि तातडीच्या उपचारांमुळे टाळता येऊ शकतात. नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, पर्याप्त पाणी पिणे, धूम्रपान टाळणे, व्यायाम करणे आणि थंडीपासून संरक्षण करणे हे उपाय स्ट्रोकपासून बचावासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
हेही वाचा :
इतके स्वस्त कुठेच नाही, Jio चे 3 स्वस्त प्लॅन्स, JioHotstar फ्री बघा,
युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्याबाई सुप्रिया सुळेंचा जोरदार डान्स अन्
शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ ४ दिवशी सर्व