रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दाैऱ्यावर आहेत.(decision)या हायप्रोफाइल भेटीसाठी दिल्ली पूर्णपणे सज्ज आहे. युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारतावर रशियाकडून व्यापार न करण्यासाठी दबाव आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही भारताने रशियासोबत व्यापार सुरू ठेवला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. मुळात म्हणजे भारत आणि रशियातील मैत्री ही संपूर्ण जगाची मोठी पोटदुखी आहे. भारताच्या मदतीला कायमच रशिया धावून आला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा फार काही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला नाही. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. हेच नाही तर यादरम्यान काही महत्वाचे करार देखील होऊ शकतात.

पुतिन आज संध्याकाळी दिल्लीत पोहोचतील आणि विमानतळावरून थेट (decision)सरदार पटेल मार्गावरील त्यांच्या हॉटेलमध्ये जातील. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन एकत्र जेवण करतील. प्रत्येक गोष्टीचे खास नियोजन करण्यात आलंय. हेच नाही तर यादरम्यान मोठी सुरक्षा देखील असेल. फक्त पुतिन हेच नाही तर रशियाचे तब्बल 7 मंंत्रीही या दाैऱ्यामध्ये सहभागी आहेत. अनेक मोठे करार होण्याचे थेट संकेत आहेत.
पुतिन यांच्यासोबत एक किंवा दोन मंत्री भारत दाैऱ्यावर आले असते तर इतकी चर्चा रंगली नसती.(decision) मात्र, पुतिन आपल्यासोबत तब्बल 7 मंत्री घेऊन आल्याने काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फक्त करारच नाही तर भारतावर सध्या अमेरिकेचा जो दबाव आहे, त्यावरही यादरम्यान चर्चा होईल. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर रशियाने जगाला दाखवून दिले की, आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत.

या भेटीकडे भारत-रशिया संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.(decision) शुक्रवारी होणाऱ्या 23 व्या वार्षिक शिखर परिषदेत संरक्षण सहकार्य, ऊर्जा, व्यापार आणि अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. भारताकडून या दाैऱ्यावर पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. रशिया आणि भारतातील मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. अमेरिका प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन आहे.
हेही वाचा :
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील शाळा 5 डिसेंबरला बंद
EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; महिला उमेदवारांवर गुन्हा
उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील