राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत.(election) विविध ठिकाणी आघाडी-बिघाडी, स्वबळाचा नारा अशी समीकरणं मांडत राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकेत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. सगळीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी माजलेली असतानाच सोलापूरमधूम एक मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या संभ्रम तयार झाला आहे. का करण्यात येत आहे ही मागणी? काय आहे त्यामागील कारण?

सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर महाराज यात्रेदरम्यानच महानगरपालिकेची(election) निवडणूक येत असल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. याच कालावधीत निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी होत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केली आहे. त्यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना एक निवेदनही पाठवले आहे.

सोलापूर महानगरपालिकेची 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. (election)या दोन दिवसात श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेचा प्रमुख सोहळ्यातील धार्मिक विधी असतात. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेला 900 वर्षाची अखंड परंपरा आहे. या निवेदनात श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा 14 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेचे नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्राद्वारे केली आहे. अर्थात याविषयीचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. तुर्तास आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगावत महापालिकेच्या वतीने प्रारूप मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली (election)असून उमेदवार तसेच नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापालिकेच्या एकूण 19 प्रभागांमध्ये मतदारांची अंतिम यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच महापालिकेच्या 17 मधली इमारतीमधील चौदाव्या मजल्यावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महापालिकेच्या 19 प्रभागामधील 75 जागांसाठी निवडणूक पार पडणार (election)असून यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. महापालिकेचे चौदाव्या मधल्या वरील अभिलेखा कक्षात उमेदवार तसेच नागरिकांसाठी अंतिम यादी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांची अंतिम प्रारूप यादी विक्रीसाठी देखील उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहे. जळगाव शहरात दुबार मतदारांसंदर्भात शासनाच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असून महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार

सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *