जपानमधील एका महिलेला आपल्या पतीच्या सत्यतेचा शोध लागला तेव्हा तिला मोठा धक्का बसला.(innocent) ज्या पतीला ती अत्यंत शांत आणि लाजाळू समजत होती, त्याचे तब्बल ५२० महिलांसोबत शारीरिक संबंध असल्याचे समोर आले. आपल्या संसारातील हा विश्वासघात तिने अत्यंत धैर्याने जगासमोर आणला असून, एका चित्रात्मक पुस्तकाच्या माध्यमातून तिची ही व्यथा मांडली आहे.नेमु कुसानो नावाच्या या महिलेचा विवाह एका ओळखीतून झाला होता. तिचा पती स्वभावाने अतिशय अबोल असल्याने ती त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत असे. मात्र, एक दिवशी पतीच्या बॅगेत तिला अनपेक्षितपणे कंडोम आणि व्हायग्रा सापडले, ज्यामुळे तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मुलाच्या गंभीर प्रकृतीमुळे ती आधीच तणावात असताना या घटनेने तिला हादरवून सोडले.

कुसानोने जेव्हा पतीचा मोबाईल तपासला, तेव्हा तिला धक्कादायक पुरावे मिळाले. (innocent)पती एका डेटिंग ॲपद्वारे अनेक महिलांच्या संपर्कात होता. त्याने आपल्या या वागण्याचे समर्थन करताना कामाचा प्रचंड ताण असल्याचे कारण दिले. त्याला आपल्या कृत्याचा कोणताही खेद नव्हता, उलट हे सर्व तो घराबाहेरचा प्रश्न असल्याचे मानत होता, ज्यामुळे कुसानोचा संताप अनावर झाला.पतीने ज्या ५२० महिलांशी संबंध ठेवले होते, त्यामध्ये अनेक एस्कॉर्ट्स आणि प्रौढ चित्रपटातील अभिनेत्रींचा समावेश होता. कुसानोला सुरुवातीला त्याचा बदला घ्यावा असे वाटले, पण मुलाच्या भविष्याचा विचार करून तिने संयम राखला.

वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी स्पष्ट केले की, तिचा पती ‘सेक्स अडिक्शन’ (innocent)नावाच्या विकाराने ग्रस्त असून ही सवय त्याला शालेय जीवनापासून होती.साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, कुसानोचा मुलगा एका अतिशय दुर्मिळ आजाराने पीडित आहे, ज्याचे रुग्ण जगभरात ३० पेक्षाही कमी आहेत. या संघर्षात तिने पतीला उपचारांसाठी नेले आणि थेरपीचीही मदत घेतली. सध्या ती आपल्या मुलाचा सांभाळ करत असून, पिरोयो अराई या कलाकाराच्या मदतीने ‘मांगा’ या जपानी शैलीतील पुस्तकातून तिने आपली ही हृदयद्रावक कथा मांडली आहे.
हेही वाचा :
कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार
सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?