एका चित्रपटावेळी सलमान खानच्या गर्लफ्रेंडचे नाव हे अभिनेता (actor)जॅकी श्रॉफसोबत जोडले गेले होते. या सर्व बातम्या समोर येत असल्याने सलमान फार नाराज होता. त्यावरून त्याचे चित्रपटाच्या सेटवर जॅकीसोबत भांडणही झाले होते. मात्र सलमानच्या प्रेयसीने त्याला समजावून त्यांचे भांडण शांत केलं. सलमान खानच्या रागाबद्दल सर्वांनाच माहित आहे. अनेकदा चित्रपटांच्या सेटवर त्याने वाद केलेल्या घटना समोर आल्या आहेत. त्याने स्वत: देखील हे कित्येक मुलाखतींमध्ये मान्य केलं आहे.

सलमान खान(actor) त्याच्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. त्याच्या नात्यांबद्दलच्याही अनेक गोष्टी समोर येत असतात. असाच त्याचा वाद झाला होता जॅकी श्रॉफबद्दल.सलमान खान आणि जॅकी श्रॉफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की सलमानने जॅकीसोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांच्यात वादही झाल्याचं म्हटलं जातं. कारण होतं सलमानच्या गर्लफ्रेंडशी जॅकी श्रॉफचे नाव जोडले गेले होते.

बंधन चित्रपटाच्या शुटींगवेळीच जॅकी आणि सलमान यांच्यात वाद झाले होते. या चित्रपटात सलमानसोबत जॅकी श्रॉफ, रंभा आणि अश्विनी भावे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात जॅकीने सलमानच्या मेहुण्याची भूमिका साकारली होती.या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी सलमानने नकार दिला होता कारण त्यावेळी सलमान आणि जॅकीमध्ये मतभेद होते.रिपोर्ट्सनुसार, या सगळ्यामागे सलमानची प्रेयसी संगीता बिजलानी हे कारण होतं. जॅकी आणि संगीताने इज्जत चित्रपटात काम करत होते तेव्हा ते एकमेकांना डेट करत होते अशा बातम्या आल्या होत्या.

त्यावेळी सलमान आणि संगीता रिलेशनशिपमध्ये होते. एका वृत्तानुसार, सलमान या अफवांमुळे खूप नाराज झाला होता आणि त्याने जॅकीसोबत कोणताही चित्रपट करण्यास नकार दिला होता.बंधनच्या सेटवर दोघांमध्ये काही वाद झाल्याचीही बातमी आली होती. पण नंतर संगीता योग्य वेळी आली आणि दोघांमधील सर्व वाद शांत केले, गैरसमज दूर केले. संगीताने स्पष्ट केले की दोघांबद्दल फक्त अफवा पसरवल्या जात आहेत. संगीताने समजवल्यानंतर सलमान देखील चित्रपटासाठी तयार झाला. त्यानंतर जॅकी आणि सलमानमध्ये सर्व काही ठीक झाले आणि तेव्हापासून दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात.

हेही वाचा :

जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मुलांना मिळेल अपेक्षित यश

PM किसानचा 21 वा हप्ता कधी येणार? महत्वाची माहिती समोर

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *