अभिनेत्री कंगना राणौत यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.(introduction) अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी स्वतःची ओळख भक्कम केली आहे. मबत्त्वाची गोष्ट म्हणजे कंगना आता फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. दरम्यान नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना यांनी खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र कंगना यांची चर्चा सुरु आहे. मुलाखतीत कंगना यांनी त्यांची डेटिंग लाईफ आणि लिव्हइन रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे.

कंगना यांना त्यांच्या लग्नाबद्दल मुलाखतीत विचारण्यात आलं. यावर कंगना म्हणाल्या, ‘तुम्हाला कसं माहिती की, मी अद्याप लग्न केलेलं नाही. तुम्ही मला ओळखत आहात असा विचार करु नका…’ त्यानंतर कंगना हसू लागल्या…कंगना पुढे म्हणाल्या, ‘लग्ना माझ्या टू – डू लिस्टमध्ये सामिल आहे. मला माहिती आहे उशीर झाला आहे. पण मी लग्न नक्की करणार आहे…’ एवढंच नाही तर, कुटुंबियांकडून लग्नासाठी प्रचंड दबाव आहे, पण प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्याची एक ठरलेली वेळ असते…
लिव्हइन रिलेशनशिपबद्दल देखील कंगना यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘लग्न आयुष्यात घडणारी प्रचंड चांगली गोष्ट आहे… पण आजची पिढी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये जास्त विश्वास ठेवते. (introduction)महिलांच्या हितासाठी लिव्हइन रिलेशनशिप बिलकूल चांगली गोष्ट नाही… मी कधी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिली नाही… पण रिलेशनशिपमध्ये राहिली आहे…’‘लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याऱ्या तरुणी प्रेग्नेंट राहतात, त्यानंतर अबॉर्शन करावं लागतं… मला असं वाटतं की, लिव्हइन रिलेशनशिप महिलांसाठी योग्य नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, फक्त अभिनेत्री आणि खासदार म्हणून नाही तर, वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील कंगना कायम चर्चेत राहतात. वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकल्या आहेत. बॉलिवूडबद्दल देखील अनेक खुलासे कंगना करत असतात. (introduction)कंगना यांनी अनेकदा बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींनी निशाणा साधला आहे… कंगना कायम वादग्रस्त परिस्थितींमुळे चर्चेत असतात.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल