गोविंदाची पत्नी (wife)सुनीता अहुजा हिने नुकतेच स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले असून, त्यातील पहिलाच व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती मजेशीर अंदाजात म्हणते, ‘सर्वांनी पैसे कमवले, आता माझी पाळी आहे. मी सुद्धा युट्यूबवर व्हिडीओ टाकणार आणि खुप पैसा कमवणार .’ तिचा हा बिनधास्तपणा आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत आहे. तिच्या या व्हिडीओ मध्ये तिचा खरा स्वभाव आणि बोलण्यातला खरेपणा अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

सुनीता अहुजा तिच्या स्पष्ट बोलण्याच्या आणि थेट स्वभावासाठी ओळखली जाते. काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्यातील नात्याबद्दल अफवा पसरत आहेत. अशा वेळी तिचा हा नवा प्रयत्न चाहत्यांना उत्सुक करून गेला आहे(wife). व्हिडीओमध्ये सुनीताने सांगितले की तिने चाहत्यांचा सांगण्यावरुन हे चॅनल सुरु केले आहे.या पहिल्या व्हिडीओमध्ये ती बाईकवर बसून मंदिरात जाते आणि चंदीगढमध्ये देवीचे दर्शन घेते. त्यानंतर, मध्येच दुकानातून दारूची बाटली खरेदी करतानाही ती दिसते. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि हलकंसं खोडकर हसू स्पष्ट दिसतं.

व्हिडिओमध्ये ती जड दागिने आणि सुंदर साडी नेसलेली दिसते, ज्यामुळे तिचा स्क्रीन प्रेझेन्स वेगळाच भासतो. तिच्यासोबत तिचा मदतनीस महेशही आहे, जो सतत मस्करी करून प्रेक्षकांना हसवतो. हातात दारूची बाटली पाहून सुनीताला नेटकऱ्यांनी भरपूर ट्रोल केले, कारण पहिल्याच व्हिडीओमध्ये ती दारू खरेदी करताना दिसली. मात्र, तिने व्हिडीओमध्ये स्पष्ट केले की, पुढील मंदिरात जाण्यासाठी तिथे देवाला मद्य अर्पण केले जाते.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी थेट ट्रोलिंग केलं. एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘ही तर फराह खानची स्वस्त कॉपी आहे.’ तर दुसऱ्याने म्हटलं, ‘कॉपी करू नका, स्वतःचं काहीतरी नवं करा.’ काहींनी मात्र तिच्या धाडसी प्रयत्नाचं कौतुक करत, ‘खूप मजा येणार आहे, जय माता दी’ असं म्हणत तिला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार सुनीताने घटस्फोटाचे कागदपत्रे तयार केले आहेत. मात्र, याबद्दल गोविंदाने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. विशेष म्हणजे, दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र कोणत्याही कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. मात्र, तिने या व्हिडीओच्या माध्यमातून हे स्पष्ट केले की तिचा आणि गोविंदाचा घटस्फोट होत नाही आहे. तसेच या सगळ्या अफवा आहेत.
सुनीता अहुजाच्या या यूट्यूब चॅनलमुळे आता लोकांना तिच्या पुढच्या व्हिडीओची उत्सुकता लागली आहे. ती कोणत्या प्रकारचे कंटेंट करणार, पुन्हा ट्रोल होणार का, की चाहत्यांची मने जिंकणार- हे पाहणं रंजक ठरणार आहे.
हेही वाचा :
Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात
‘कहीं आग लगे लग जावे….सानिया मिर्झा कुणाच्या आठवणीत झुरतेय
भल्याभल्यांना नादाला लावणारी बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही!