कॉमेडी क्वीन भारती सिंह अलिकडेच दुसऱ्यांदा आई झाली आहे.(comedy) तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारती सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे युट्यूब चॅनेल देखील आहे. ज्यात ती आपल्या आयुष्यातील घडामोडींचे अपडेट देते. बाळाच्या जन्मानंतर भारती सिंह पुन्हा कामावर परतली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये ती बोलताना दिसली की, “देवाचे लाख लाख आभार की, मला मुलगी नाही…” याचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.भारती सिंहने गेल्यावर्षी 19 डिसेंबर 2025 गोंडस मुलाला जन्म दिला. भारती आणि हर्षने अनेक वेळा ‘आम्हाला दुसरी मुलगी व्हावी’ अशी इच्छा व्यक्त केली होती. पण आता व्लॉगमध्ये भारती सिंह देवाचे (comedy)आभार मानताना दिसत आहे. तसेच ती म्हणाली की, “मुलं आई-वडिलांना घराबाहेर काढण्याची भाषा करतात, हे मला अजिबात आवडत नाही. जे चुकीचे आहे…”

भारती सिंह म्हणते की, “देवाचे लाख लाख आभार आहेत, आम्हाला मुलगी नाही. (comedy)आपण मुलीला मोठे करतो. तिचे चांगले संगोपन करतो. पण एक दिवशी तिचे लग्न करून तिला सासरी पाठवतो. एकदा गोला मला गमतीत म्हणाला, मी निघून जाईन, तेव्हा मला इतकं वाईट वाटले. तेव्हा मुलीला स्वतः पासून दूर करणे मी सहनच करू शकले नसते. ज्यांना मुलगी आहे, ते आई-वडील खरंच खूप धन्य आहेत. जे काळजावर दगड ठेवून मुलीला शिकवतात. मोठे करतात आणि लग्न करून सासरी पाठवतात…”2017ला भारती सिंहने लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2022 मध्ये तिने लक्ष सिंग लिंबाचियाला जन्म दिला. लक्षचे टोपणनाव गोला आहे. तर दुसऱ्या मुलाचे टोपणनाव नाव ‘काजू’ ठेवले आहे. भारती सिंह आता पुन्हा एकदा ‘लाफ्टर शेफ्स’च्या सेटवर आली आहे.
हेही वाचा :
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात
युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः
ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन