सकाळी उठल्या-उठल्या बहुतांश लोकांना चहा लागतो.(harmful)जोपर्यंत चहा पीत नाहीत तोपर्यंत अनेकांचा दिवस सुरु होत नाही.काहीजण तर मोठा कप भरुन चहा पितात. सोबत बिस्किटाचा भलामोठा पुडाही फस्त करतात. सकाळी चहा-बिस्कीट हे कॉम्बिनेशन ठरलेलंच असतं. यावर कडी म्हणजे काहीजण सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तीन वेळा चहात बिस्कीट बुडवून खातात. तुम्हाला चहात बुडवून बिस्कीट खाण्यात काही गैर वाटत नसेल. पण चहात बिस्कीटं बुडवून खाणं आरोग्याला हितकारक नसल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय.

भारतात सकाळ-संध्याकाळ चहासोबत बिस्किटे बुडवून खाणे ही (harmful)अनेकांची आवडती सवय आहे. ही जोडी खूपच लोकप्रिय असली तरी आरोग्य तज्ज्ञांच्या मते ती धोकादायक ठरू शकते. बिस्किटांमध्ये रिफाइंड मैदा, जास्त साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबी असते. चहासोबत खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. याशिवाय पचन बिघडते, बद्धकोष्ठता येते आणि दात खराब होतात. रिकाम्या पोटी ही सवय आणखी हानिकारक ठरते.
चहा आणि बिस्कीट एकत्र खाण्याचे परिणाम
चहा हा स्वतःच कॅफिनयुक्त असतो,त्यासोबत साखरयुक्त(harmful) बिस्कीट खाल्ल्यास शरीरात साखरेची पातळी वाढते. थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. तसंच चहातील टॅनिन घटक आणि बिस्कीटातील प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा एकत्रित परिणाम पचनावर होतो. बिस्किटांमध्ये जास्त कॅलरी, मैदा आणि ट्रान्स फॅट्स असतात, ज्यामुळे चरबी वाढते आणि वजन वाढते. रिफाइंड पीठ आणि फायबरच्या कमतरतेमुळे गॅस, अॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या उद्भवते. काही बिस्किटांमध्ये पाम ऑइल वापरलं जातं सोडियममुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

सकाळी उठल्या-उठल्या तुम्हीही चहामध्ये बिस्किट बुडवून खात (harmful)असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अती धोकादायक ठरू शकतं, सकाळी-सकाळी तुम्ही आजारांना निमंत्रण देतात, त्यामुळे चहासोबत बिस्किट खाणं टाळून त्याऐवजी तुम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकतात.फक्त चहा प्यायल्यानं अॅसिडीटी होऊ शकते, त्यामुळे चहासोबत काहीतरी खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र, चहासोबत बिस्कीट खाणं हे शरिरासाठी अपायकारक आहे, त्यामुळे तुम्ही चहासोबत बिस्कीट न खाता हेल्दी स्नॅक खाऊ शकतात, जेणेकरून तुमच्या शरीरावर याचा परिणाम होणार नाही, आणि तुमचं आरोग्य तुम्ही निरोगी ठेवू शकतातबिस्किटांऐवजी बदाम, फळे किंवा होल ग्रेन स्नॅक्स घ्या. ही सवय बदलल्यास आरोग्य चांगले राहील, असे . तज्ज्ञ सुचवतात.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या