बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (joining) पुन्हा एकदा आपल्या गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वेलमुळे चर्चेत आला आहे. 2009 साली प्रदर्शित झालेल्या आणि आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘3 इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, या सीक्वेलमध्ये रँचो, राजू आणि फरहानसोबत आता आणखी एका नव्या ‘इडियट’ची एंट्री होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ‘3 इडियट्स’च्या सीक्वेलसाठी सध्या ‘4 इडियट्स’ हे तात्पुरते नाव विचाराधीन आहे.

हे नाव पुढे बदलू शकते, मात्र सध्या कथा आणि पटकथेला (joining)अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. निर्माते या फ्रँचायजीला आणखी मोठ्या स्तरावर नेण्याच्या तयारीत असून, त्यासाठी एका मोठ्या बॉलिवूड सुपरस्टारचा शोध सुरू आहे, जो चौथा ‘इडियट’ म्हणून चित्रपटात झळकणार आहे.या बहुचर्चित सीक्वेलमध्ये आमिर खान रँचो, आर. माधवन फरहान, शर्मन जोशी राजू आणि करीना कपूर खान हे कलाकार आपापल्या भूमिका पुन्हा साकारणार असल्याची शक्यता आहे. यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. मात्र, चौथ्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
एका रिपोर्टनुसार, ‘4 इडियट्स’ची कथा पहिल्या भागाच्या पुढे नेली जाणार आहे. (joining)हा फक्त साधा सीक्वेल नसेल, तर नव्या विचारसरणी, नव्या आव्हानांबरोबरच काही नवीन व्यक्तिरेखा कथेत समाविष्ट केल्या जातील. चौथ्या प्रमुख पात्राची गरज कथानकातूनच निर्माण होईल’. यामुळे हा चित्रपट केवळ जुन्या आठवणींवर आधारित न राहता, नव्या पिढीशी जोडणारा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.डिसेंबर 2009 मध्ये प्रदर्शित झालेला ‘3 इडियट्स’ हा चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट मानला जातो.

आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर खान (joining)आणि बोमन इराणी यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता.अशातच 3 इडियट्स’चा सीक्वेल येणार असल्याची बातमी समजताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. जुन्या तिघांना पुन्हा एकत्र पाहण्याची संधी आणि त्यातच एका नव्या सुपरस्टारची भर यामुळे ‘4 इडियट्स’ हा चित्रपट नेमका कोणता नवा रंग दाखवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
लिव्ह-इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर बातमीचा पाऊस
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूम सेल्फी तुफान व्हायरल; फोटो पाहून चाहते थक्क