आजच्या वेगवान डिजिटल जीवनशैलीत वायफाय राउटरशिवाय दैनंदिन (dangerous) कामकाजाची कल्पनाही करता येत नाही. घरातील प्रत्येक सदस्य मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या उपकरणांसाठी वायफायवर अवलंबून आहे. मात्र रात्री झोपण्याच्या वेळी वायफाय राउटर सुरू ठेवणे योग्य आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. याबाबत तज्ज्ञांचे मत लक्षात घेण्यासारखे आहे.तज्ज्ञांच्या मते, वायफाय राउटर सतत सुरू ठेवल्याने त्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित होत राहते. हे रेडिएशन थेट दिसत नसले तरी त्याचा शरीरावर हळूहळू परिणाम होऊ शकतो. विशेषतः रात्रीच्या शांत वातावरणात हे सिग्नल मेंदूवर अधिक प्रभाव टाकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी राउटर बंद करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते असे अभ्यासक सांगतात.

वायफाय सिग्नलमुळे मेंदूतील नैसर्गिक लहरींमध्ये व्यत्यय येतो. (dangerous)याचा परिणाम गाढ झोप न लागणे किंवा वारंवार झोपमोड होणे असा होऊ शकतो.तसेच झोपेसाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन हे संप्रेरक योग्य प्रमाणात स्रवण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी निद्रानाश, अस्वस्थता आणि थकवा जाणवू शकतो.सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी होणे, चिडचिड वाढणे, कामात लक्ष न लागणे आणि मानसिक ताण वाढणे अशी लक्षणे अनेकांना जाणवतात.लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर या लहरींचा परिणाम अधिक तीव्र असू शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

त्यामुळे झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी वायफाय राउटर बंद (dangerous)केल्यास मेंदूला शांतता मिळते आणि शरीराची नैसर्गिक विश्रांती प्रक्रिया जास्ती प्रभावीपणे कार्य करते.आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक आणि तांत्रिक बाबींमध्येही याचे फायदे आहेत.रात्री वायफाय बंद ठेवल्याने विजेची बचत होते आणि राउटरवर अनावश्यक ताण पडत नाही. यामुळे उपकरणाचे आयुष्य वाढण्यास मदत होते.तसेच इंटरनेट बंद असल्याने सायबर हल्ले किंवा अनधिकृत प्रवेशाचा धोका कमी होतो.एकूणच चांगली झोप, मानसिक शांतता, आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेसाठी रात्री झोपण्यापूर्वी वायफाय राउटर बंद करण्याची सवय लावणे फायदेशीर ठरू शकते.डिजिटल सुविधा वापरताना योग्य मर्यादा पाळणे हीच आजच्या काळाची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा :

निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: हातकणंगलेत समर्थकांचा ‘महापूर’, कोल्हापूर-सांगली रस्ता ठप्प!

थेट अमेरिकेत घुसून डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या? इराणच्या डोक्यात नेमका प्लॅन काय

धनश्रीसोबत घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलला वैयक्तिक आयुष्यात आणखी एक मोठा धक्का

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *