विदर्भातील अकोला जिल्ह्यातून धक्कादायक आणि माणुसकीला (neighboring) काळीमा फासणारी घटना समोर आली. जन्मदात्या पित्याने 12 वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर उघडकीस झाला आहे. सुरुवातीला वडिलांकडून मग काकाने आणि त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आजोबाने देखील या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या अडसूळ गावातील ही घटना आहे.दरम्यान, या धक्कादायक प्रकरणाचं गांभीर्याने पाहता तेल्हारा पोलिसांनी तत्काळ दखल घेत कुटुंबातीलच 2 आणि आजोबा विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर शाळेतील शिक्षकांसमोर वडिलांसह इतरांची तक्रार मांडली होती. त्यानंतर हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

दरम्यान, गावातील शाळेतील मुख्याध्यापकांसमोर या पीडित (neighboring) अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तिचं म्हणणं ऐकल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. त्याचवेळी चाईल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान चाईल्ड लाईन आणि शाळेतील मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तातडीने तेल्हारा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी देखील हे प्रकरण तितकच गांभीर्याने घेतलं.मुख्याध्यापकाच्या तक्रारीनंतर वडीलांसह काका आणि शेजारी राहणाऱ्या एका म्हाताऱ्यावर गुन्हे दाखल केले.

अपराध क्रमांक 382/25 कलम 64(2)(f),(m), 65(1) BNS सह 4,6,8 बाल संरक्षण(neighboring) कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल झाले. तेल्हारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि काका गेल्या सहा अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करत होते. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी वडील आणि शेजारी राहणाऱ्या आजोबाला अटक केली आहे.अत्याचार करणाऱ्या शेजारील आजोबाचं नाव गजानन भोम असं आहे. तर नराधम काका हा फरार आहे, तो मागील 20 दिवसांपासून पुणे येथे आहे. दरम्यान मुलीचं वय 12 वर्ष 8 महिने 22 दिवस असून ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिचं वारंवार लैंगिक शोषण केलंय. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करत आहेत.
हेही वाचा :
पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत
१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते
घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल