देशाच्या कोणत्या कोपऱ्यात महिला सुरक्षित आहेत असा प्रश्न पुन्हा एक उपस्थित झाला आहे.(grade) कारण आठवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाला आहे. नंदुरबार येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकानेच बलात्कार केला. मुख्यध्यापकाच्या अशा वर्तनामुळे इतर मुलांची सुरक्षा देखील वाऱ्यावर आहे… मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्यांमुळे शाळेत देखील मुली सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्याध्यापकाने फक्त विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले नाही तर, तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या घटनेमुळे आश्रममध्ये खळबळ माजली आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आई-वडिलांना (grade)सांगितल्यानंतर धडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आश्रम शाळा तलाईच्या मुख्याध्यापक सह वस्तीगृहाच्या व्यवस्थापिकेवर देखली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी आता अधिक चौकशी करत आहेत…घटना उघड झाल्यानंतर आदिवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण दिसत आहे… घटलेल्या घटनेनंतर आदिवासी आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनासमोर आल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुलीचं कुटुंबिय आणि गावकऱ्यांनी केली आहे… त्यामुळे आता याप्रकरणी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आज कोणत्याच क्षेत्रात मुली मागे नाही… मोठ्या जिद्देने आणि कष्टाने (grade)महिला आपलं ध्येय साधताना दिसत आहे… पण दुसरी आणि सर्वात वाईट बाजू म्हणजे देशाचं नाव मोठ्या करणाऱ्या मुली आणि महिला खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे… तर कोणत्यात क्षेत्रात महिला सुरक्षित नाही… फक्त क्षेत्रच नाही तर, शाळेत देखील मुली सुरक्षित नाही… त्यामुळे मुलींना शाळेत पाठवायचं की नाही?शाळेत देखील मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत… 3.30 वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांच्या वृद्ध महिलेवर देखील बलात्कार होत आहे. फक्त बलात्कार नाही तर, अनेक मुलींंनी यामध्ये आपले प्राण देखील गमावले आहेत… अशात महिलांच्या सुरक्षेचं काय? हा सर्वात मोठा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे…
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक