अक्षय खन्ना सध्या ‘धुरंधर’चं यश प्रचंड एन्जॉय करत आहे. 22 दिवसांतच(withdrawal)चित्रपटाने 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र अक्षयच्या अडचणी वाढू शकतात असं दिसतंय. कारण अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ हा चित्रपट त्याने सोडलाय, पण त्यामुळे चित्रपटाचे मेकर्स प्रचंड संतापले आहेत. हा चित्रपट पुढल्या वर्षी, म्हणजेच 2 ऑक्टोबर 2026 ला रिलीज होणार आहे. अजय देवगणची यात प्रमुख भूमिका असून दुसऱ्या पार्टप्रमाणेच तिसऱ्या पार्टमध्येही अक्षय खन्ना झळकणार होता. मात्र त्याने यात काम करण्यासाठी 21 कोटी रुपये मागितले होते. एवढंच नव्हे तर या चित्रपटात त्याला विग देण्यात यावा अशीही मागणी त्याने केली होती. पण मेकर्सनी संपत्ती न दिल्याने अखेर तो चित्रपटातून बाहेर पडला. आता, ‘दृश्यम 3’ चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नावर टीका केली असून त्याच्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.

बऱ्याच काळापासून अशी चर्चा सुरू होती की अक्षय खन्ना(withdrawal) ‘दृश्यम 3’ चित्रपटात नसेल. याच दरम्यान आता बॉलीवूड हंगामावर एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. खरंतर, “दृश्यम 3” चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्ना बद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपण अक्षय खन्ना याला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.एवढंच नव्हे तर आता “दृश्यम 3″मध्ये अक्षय खन्ना नव्हे तर त्याच्या जागी जयदीप अहलावत हा अभिनेता दिसेल. पण मेकर्स एवढे संतापलेत तरी का ?
अक्षय खन्ना Drishyam 3 चित्रपटामधून बाहेर पडला आहे. मानधनामुळे तो बाहेर पडल्याचे कुमार मंगत पाठक यांनी कन्फर्म केलं. एका वेबसाईटशी बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला. यावेळी बोलताना प्रोड्यूसर कुमार मंग पाठ म्हणाले की, अक्षय खन्नाने निर्मात्यांशी करार केला होता. दोन्ही पक्षांमध्ये बरीच चर्चा झाल्यानंतर, अभिनेत्याची फी निश्चित करण्यात आली. त्यानंतर, त्याने निर्मात्यांना विग घालण्याची मागणी केली, ज्यावर दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. हे प्रॅक्टिकल नसल्याचंही त्यांनी सांगितलं, कारण त्यामुळे दृश्यम 3 ची कंटिन्युटी तुटेल. कारण दृश्यम पार्ट 2 मध्ये अक्षय दिसला, तेव्हा त्याने विग घातला नव्हता. जेव्हा ही बोलणी झाली तेव्हा अक्षय खन्नाने समहती दर्शवली होती, असं कुमार मंगत यांनी सांगितलं.
” पण काही चमच्यांनी त्याला सल्ला दिला की विग घालून तो चांगला दिसेल, त्यानंतर अक्षयने पुन्हा विगसाठी रिक्वेस्ट केली. अखेर अभिषेक पाठकने त्याचं म्हणणं ऐकलं. पण नंतर अक्षयने मेकर्सना सांगितलं की त्याला या चित्रपटात काम करायचं नाहीये” असं कुमार मंगत पाठk म्हणाले.यादरम्यान बोलताना कुमार मंगत पाठक यांनी असाही खुलासा केला की त्यांनी अक्षय खन्नासोबत “कलम 375” बनवला , तेव्हा त्याची काहीच व्हॅल्यू नव्हती. पाठक यांनी अक्षयच्या अव्यावसायिक वर्तनाबद्दलही सांगितलं. ते म्हणाले, “त्या वेळी अनेक लोकांनी मला सांगितलं होतं की अक्षय खन्नासोबत काम करू नकोस. त्याची एनर्जी खूप टॉक्सिक आहे. सेक्शन 375 मुळेच त्याला ओळख मिळाली, त्यानंतरच त्याला ‘दृश्यम 2’ची ऑफर मिळाली.याच चित्रपटांमुळे त्याला अनेक मोठ्या चित्रपटांचे रोल ऑफर झाले, नाहीतर 3-4 वर्ष तो घरीच बसला होता ” असं पाठक यांनी सांगितलं.

पुढे कुमार मंगत म्हणाले की, अक्षय खन्नाच्या डोक्यात हवा गेली आहे (withdrawal)यश डोक्यात गेलं . तो म्हणाला की, धुरंधर माझ्यामुळे चालतोय, मग मी त्याला समजावलं की अनेक फॅक्टर्समुळे ”धुरंधर’ चित्रपट चालतोय. तसेच Drishyam 3 मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. जसं विकी कौशलच्या छावामध्ये तो अक्षय लीड रोलमध्ये नव्हता, तसंच धुरंधरमध्येही आहे, तो रणवीर सिंगचा चित्रपट आहे. जर आजच्या काळात त्याने एकही सोलो चित्रपट केला तर तो भारतात 50 कोटी पण कवमू शकणार नाही, अशा शब्दांत कुमार मंगत पाठक यांनी अक्षयवर टीका केली.“अक्षय खन्नाला वाटतंय की तो सुपरस्टार बनला आहे. असं असेल तर कोणत्याही स्टुडिओकडे जा, आणि सुपरस्टार बजेट असलेला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न कर. पण त्या चित्रपटाला कोण हिरवा कंदील दाखवतो हे दिसेल. काही कलाकार मल्टीस्टारर चित्रपट करतात आणि ते हिट झाल्यानंतर त्यांना वाटतं की ते सुपरस्टार झालेत,” असंही पाठक यांनी सुनावलं.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit