जालना महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जागा (party)वाटपाबाबत शनिवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत सहभागी झालेली अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी करण्यासाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी, रासपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, परंतु जागा वाटपाचा समन्वय न झाल्याने याचंही अजून बिनसलेलं आहे. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत महायुतीच्या नेतेमंडळींची शनिवारी रात्री आईसाहेब लॉन्समध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार भाजप ला 32, शिवसेनेला 26, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 5 आणि अन्य मित्र पक्षांना प्रत्येकी 1 जागा देण्याचे ठरविण्यात आले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 5 जागा मिळत (party)असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिल्यानंतर रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण आणि शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली. याच बैठकीत दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडीतून महानगरपालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यानंतर ठाकरे सेनेसोबत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली.(party)महाविकास आघाडी करण्यासाठी रविवारी रात्री काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी, रासपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.जालन्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठकांवर बैठका पार पडत आहेत. मात्र अजूनही युती आणि आघाडी जाहीर झालेली नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी जाहीर झाल्यानंतर पक्षातील नाराज बंडखोरी करण्याच्या धास्तीने महायुती किंवा महाविकास आघाडी जाहीर होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit