भारतीय सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या अनेक योजना आहे.(pension) एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांसाठी योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर पेन्शन मिळते. अशीच एक योजना म्हणजे एलआयसी स्मार्ट पेन्शन योजना.एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेत पॉलिसीधारकांना एकरकमी सिंगल प्रिमियम रक्कम गुंतवायची असते. यानंतर तुम्हाला लगेचच पेन्शन मिळते.

अनेकजण शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात.(pension)परंतु त्यातील परतावा हा कमी जास्त होत असतो. ज्या लोकांना दर महिन्याला ठरावीक रक्कम हवी असते त्यांच्यासाठी ही योजना बेस्ड आहे. ही एक Non-linked Non-Participating योजना आहे. या योजनेत कोणत्याही प्रकारची रिस्क नसते. पॉलिसीत घेतानाच तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे समजते.

या योजनेत सिंगल आणि जॉइंट अकाउंटदेखील उघडू शकतात. (pension)याचसोबत मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पेन्शनचा ऑप्शन निवडू शकतात. याचसोबत पेन्शनची रक्कम वाढवण्याचाही ऑप्शन असतो. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर ही रक्कम परत दिली जाते.एलआयसी स्मार्ट पेन्शन स्कीममध्ये अॅन्युटीची रक्कम १ लाख रुपये आहे. यामध्ये जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करु शकतात. या योजनेत नॅशनल पेन्शन स्कीमअंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळतो. या योजनेत तुम्ही जर ३५ ते ५५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला महिन्याला २० हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *