विविध व्यवसाय क्षेत्रांमध्ये टाटा समुहाचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं,(leading)मात्र आता याच समुहानं हॉटेलिंग क्षेत्रातील एक अनपेक्षित आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेत अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. टाटा उद्योग समुहातील हॉटेलांचं व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘इंडियन हॉटेल्स’ नं एक महत्त्वाचा निर्मय घेत आपले शेअर विकण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज GVK हॉटेल्स एंड रिसॉर्ट्स मधील पूक्ण भागिदारी ताजनं विकली असून, (leading)या निर्णयासोबतच कंपनीसोबतचं टाटा समुहाचं औपचारिक आणि मालकी नातं संपुष्टात आलं आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी शेअर बाजाराचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर एक्सचेंज फायलिंगमध्ये इंडियन हॉटेल्सच्या वतीनं याबाबतची माहिती देण्यात आली. या माहितीनुसार कंपनीनं GVK मध्ये असणारी 25.52% च्या भागिदारीचे साधारण 1.6 कोटींचे शेअर शालिनी भूपाल यांना 370 रुपये प्रति शेअर इतक्या किमतीनं विकले.
ताज जीवीकेमधील पूर्ण भागिदारी विकल्यानंतर आता हॉटेल कंपनीकडून (leading)कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवहारांमध्ये ‘ताज’ या नावाचा केला जाणारा औपचारिक वापर बंद करण्यासाठीची कारवाई सुरू करत असून, एक नवं नाव इथं जोडलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. IHCL नं याचबाबत दिलेल्या आणखी एका महत्त्वाच्या माहितीनुसार हॉटेल ऑपरेटिंग कराराअंतर्गत ताज GVKच्या इतर हॉटेलमध्ये कार्यवाही मात्र सुरू राहील असं सांगण्यात आलं आहे.

या स्टेक सेलनंतर IHCL, शालिनी भूपाल, GVK प्रमोटर कुटुंबाचे सदस्य (leading)आणि कंपनीमध्ये एक टर्मिनेशन करार झाला असून, या कराराअंतर्गत 2011 मध्ये हा करार झाला, 2007 मधील नावाचा करार आणि ट्रेडमार्क लायसन्स अॅग्रीमेंट रद्द करण्यात आलं. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार ताज GVK हॉटेल्सच्या व्यवस्थापकिय समितीवर असणाऱ्या आणि IHCL नं सुचवलेल्या सर्व संचालकांनी सोमवारी कार्यालयीन कामाच्या तासांनंतर पदाचा राजीनामा दिला. आता 74.99% इतक्या भागिदारीसह GVK-भूपाल कुटुंब या ब्रँडचं प्रमोटर राहणार असून, सद्यस्थितीला 6 हॉटेलं आणि बंगळुरूतील प्रॉपर्टी सांभाळण्याचं काम सुरू ठेवण्यात येईल.
हेही वाचा :
मोठी बातमी! LPG वरील सबसिडी बंद होणार? तुमचा
चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा
90 टक्के आयफोन युजर्सना माहिती नाही हे गुप्त फिचर्स,