सध्याच्या जगात माणूसकीचे दर्शन फार कमी पाहायला मिळते.(floor) प्रत्येकजण फक्त आपल्यापुरतं बघत असतात. याच स्वार्थी जगात कुठेतरी माणुसकीचे दर्शन होते. चीनच्या गुआंगझौ शहरात अशीच एक घटना घडली आहे. एका लहान बाळाला वाचवण्यासाठी एक व्यक्ती चक्क खिडकीवरुन चौथ्या मजल्यापर्यंत चढला आणि त्याने बाळाचा जीव सुखरुप वाचवला.२४ डिसेंबरला संध्याकाळी तियान्हे येथील एका रहिवासी सोसायटीत एक लहान मूल चौथ्या मजल्याच्या खिडकीत अडकले होते. हे मूळ खेळता खेळता खिडकीच्या सेफ्टी ग्रिलमध्ये अडकले. मुलाचे डोके ग्रिलच्या लहानशा फटीत अडकले होते आणि पाय बाहेर लटकलेले होते. हे बाळ जोरजोरात रडत होते. त्यामुळे आजूबाजूला गर्दी झाली.

खिडकीच्या ग्रिलमध्ये डोके अडकल्याने त्या बाळाला काही (floor)करताही येत नव्हते. त्याला काही करताही येत नव्हते. त्यात घरातदेखील कोणीही नव्हते. घराचे दिवे बंद होते. यामुळे कोणालाच काय करावे हे समजत नव्हते. जेव्हा या मुलाचा रडण्याचा आवाजा आला तेव्हा आजूबाजूला खूप गर्दी झाली.जमलेल्या लोकांपैकी कोणालाच काय करावे हे कळत नव्हते. तेवढच्या तीन तरुण पुढे सरसावले. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या मुलाला वाचवले. एका तरुणाने बाहेरुन खिडकीवर चढण्यास सुरुवात केली. तिथे असलेले पाईप आणि इतरांच्या खिडकीच्या आधारे तो हळूहळू वर चढू लागला.
एक तरुण वर चौथ्या मजल्यापर्यंत चढला तर दोन तरुण खाली चादर घेऊन उभे होते. (floor)जेणेकरुन जर मुलं पडले तर त्याला झेलता येईल. वर चौथ्या मजल्यावरच्या खिडकीजवळ हा तरुण पोहचला आणि त्याने त्या मुलाला वाचवले. हळूच त्याचे डोके ग्रिलमधून आतमध्ये ढकलले. त्यानंतर तो मुलगा पूर्णपणे खिडकीतून आतमध्ये घरात गेला.घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहचले. परंतु त्याआधीच या मुलांनी बाळाला सुखरुप बाहेर काढले होते. हे बचाव कार्य अवघ्या १० मिनिटात पूर्ण झाले. या मुलाची नंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये बाळ सुखरुप असल्याचे समजले.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका