31 डिसेंबर 2025 रोजी झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट (delivery) यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरील डिलिव्हरी कर्मचारी देशव्यापी संप करत आहेत. यामुळे नवीन वर्षाच्या जल्लोषात खाण्यापिण्याच्या आणि किराणा सामानाच्या ऑर्डर्सना मोठा फटका बसू शकतो. पार्टी, पिकनिक किंवा कुटुंबीयांसोबत जेवणाची तयारी करणाऱ्यांसाठी ही मोठी अडचण ठरू शकते, कारण या अॅप्सवरून मिनिटांत माल मिळण्याची सोय बंद पडलीय. पण अशावेळी तुमच्याकडे काय पर्याय असतील? सविस्तर जाणून घेऊया.स्विगी, झोमॅटो डिलीव्हरी बॉय संपावर गेले असले तरीही स्थानिक दुकाने आणि हॉटेल्सची सेवा सुरू राहील. कारण त्यांचे कर्मचारी या संपात सहभागी नाहीत.घरी किराणा सामान मागवायचे असेल तर आपल्या सोसायटी किंवा आजूबाजूच्या भागातील 2-4 विश्वासू किराणा दुकानांची यादी तयार करा. ही दुकाने स्वतःच्या नियमित कर्मचाऱ्यांमार्फत होम डिलिव्हरी करतात, जी संपाच्या प्रभावापासून मुक्त असते. आधीच त्यांचे फोन नंबर मोबाईलमध्ये साठवून ठेवा. गरज पडली की थेट फोन करून ऑर्डर द्या – दूध, भाज्या, धान्य किंवा इतर दैनंदिन वस्तू लवकरच घरी पोहोचतील.

नवीन वर्षाच्या पार्टीसाठी पिझ्झा, बर्गर, चिकन किंवा पनीर डिशेस हव्या (delivery)असतील तर घरापासून 1-2 किलोमीटर अंतरावरील स्थानिक रेस्टॉरंट्स, ढाबे किंवा हॉटेल्स शोधा. अनेकांना स्वतःची डिलिव्हरी व्यवस्था असते. त्यांचे मेनू कार्ड गोळा करा, संपर्क क्रमांक नोट करा आणि थेट कॉल करून ऑर्डर द्या. कुटुंब किंवा मित्रांसोबत गरमागरम जेवणाचा आनंद घ्या, कारण ही सेवा अॅप्सवर अवलंबून नसते.आजकाल अनेक स्थानिक किराणा दुकानदार आणि रेस्टॉरंट्स व्हॉट्सअॅपवरून ऑर्डर घेतात. त्यांचे व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह करा. मेनूनुसार हवी ती वस्तू लिहून पाठवा, घरचा पत्ता स्पष्ट द्या. यानंतर काही वेळात सामान डिलिव्हर होईल. उदाहरणार्थ नोएडासारख्या भागात अशी सेवा खूप लोकप्रिय आहे. ही पद्धत जलद आणि सोयीची आहे. विशेषतः सोसायटीमध्ये राहणाऱ्यांना याचा फायदा होईल.

जर तुम्ही नवीन भागात राहत असाल किंवा जवळच्या दुकानांची माहिती नसेल,(delivery) तर जस्टडायलच्या ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करा – 08888888888. तुमचा परिसर सांगा, ते होम डिलिव्हरी करणाऱ्या किराणा दुकानांचे, हॉटेल्सचे किंवा रेस्टॉरंट्सचे नंबर लगेच देतील. यामुळे कोणतीही माहिती नसतानाही लवकर पर्याय मिळतो.या सर्व पर्यायांमुळे ऑनलाइन अॅप्स बंद असले तरी नवीन वर्षाचा आनंद कमी होणार नाही. आधीच तयारी करून स्थानिक सेवांचा वापर करा, जेणेकरून पार्टीची मजा अबाधित राहील. स्थानिक दुकानदारांना पाठिंबा देऊन त्यांच्याकडून विश्वासार्ह सेवा मिळवा. अशा प्रकारे संपाच्या काळातही खाण्यापिण्याची आणि किराण्याची सोय सहज शक्य आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह
हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?
कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची